शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:49 IST

वडीकाळ्या गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईत वर्षा निवासस्थानावर चर्चा झाली.

- श्याम पाटीलसुखापुरी (जि. जालना): मराठा आरक्षणासाठी ५ फेब्रुवारीपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथे गोदाकाठचे शेकडो गावे एकत्र येत आंदोलन करणार आहेत. गावकऱ्यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी एक तास मंत्रालयात चर्चा केली. परंतु, शिष्टमंडळातील सदस्यांच्या मागण्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने गावकरी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. तर शिष्टमंडळाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

२५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले पत्र घेऊन आले होते. ते पत्र स्वीकारून वडीकाळ्या गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईत वर्षा निवासस्थानावर चर्चा झाली. या बैठकीत मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा झाली. सरकारने मराठा समाजास ओबीसींच्या पन्नास टक्के कोट्यातून आरक्षण द्यावे, ही मागणी लावून धरली. मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्वी आरक्षण होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. कोपर्डी खटला सुरू करण्यात यावा. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात होस्टेलची सुविधा निर्माण करावी, या प्रमुख मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, परंतु त्यावर बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही. या मागण्यांवर पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

आरक्षण मिळेपर्यंत माघार नाहीमराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायचीच नाही, असा पवित्रा गोदाकाठच्या गावांनी घेतला आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणावर गावकरी ठाम आहेत. ओबीसीमधून ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारने कायदेशीर तोडगा काढावा, अशी आमची मागणी आहे.  - मनोज जरांगे, आंदोलक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाEknath Shindeएकनाथ शिंदे