शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:08 IST

मराठा आंदोलनामुळे आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

जालना : आताचे सरकार ही आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे. मराठा आंदोलनाचा फटका भाजपाला बसणारच आहे. मात्र, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

आज जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी आजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काहीही केले नसल्याची टीकाही  केली. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

अध्यादेश काढावा सरकार आरक्षणाबाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला दिलासा देण्याचे काम करावे. याचा समावेश नंतर घटनेच्या परिष्ठ ९ मध्ये करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यालयात रद्द होणार नाही अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केली.

मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष असावा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन