शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:55 IST

मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली

पवन पवार

वडीगोद्री : रविवारी सकाळी सात वाजता राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले म्हणाले. अंतरवाली सराटीत दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेतली असून बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली. उद्या पुन्हा चर्चा होईल असे जरांगे यांनी सांगितले आहे.

आता ३ नोव्हेंबर रोजी उमेदवार कोण या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे. उद्या ते मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अंतरवाली सराटीत दलीत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली. या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्यावतीने माजेद शेख हे उपस्थित होते.

मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली, उद्या पुन्हा चर्चा होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. उद्या सकाळी 7 वाजता राज्यातील सगळे उमेदवार अंतरवाली सराटीत चर्चेला या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवार यांच्या नावाची उद्या मनोज जरांगे घोषणा करण्याची शक्यता असून उद्या सायंकाळी पाच किंवा रात्री आठ किंवा १० वाजेपर्यंत चांगला निर्णय होईल, असं जरांगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या देशात रेशीमबागेला अंतरवाली चॅलेंज ठरेल असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केलं आहे. या महाराष्ट्रात जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांचीच अपेक्षा असल्याचं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं. दिवाळी पाडव्या निमित्त मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उमेदवार व नेते मंडळी यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण