शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 08:44 IST

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला अन् गाव राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : सोलापुर-धुळे राष्ट्रीय महामार्गवरील वडीगोद्रीपासून अंतरवाली सराटी गाव तीन किलोमीटर अंतरावर. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला अन् गाव राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. लोकसंख्या ५ हजार. मतदान ३२००. गावात ४० टक्के मराठा समाज. अनुसूचित जाती २० टक्के, ओबीसी ३० टक्के आणि इतर १० टक्के असा संमिश्र समाज गुण्यागोविंदाने नांदतो.

गावातील वयोवृद्ध मुरलीधर तारख हे शेतकरी शुक्रवारी दिवसभर आंदोलन स्थळी होते. ते म्हणाले, आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. पोलिस गावात येऊन चौकशी करून जात होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉक्टरांनी तपासणी केली. पोलिसांच्या आग्रहामुळे उपोषणकर्त्याने पाणी पिले. त्यानंतर पोलिस निघून गेले. मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांना सहा जार पाणी पाजले. त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास गावाच्या तीन बाजूंनी फौजफाटा घेऊन पोलिस आले. दिसेल त्याला झोडपले. 

गावात शुकशुकाटगावात प्रवेश करतानाच कमानीच्या आत मारोती मंदिराच्या बाजूलाच उपोषणस्थळ. शुक्रवारच्या घटनेनंतर अख्खे गावच उपोषणस्थळी बसून आहे. त्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. 

३६६ आंदोलकांवर [अंतरवाली सराटीतील] गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे नोंदवताना अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली.लावलेली कलमे अशी : खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) | सरकारी नोकरावर हल्ला (गंभीर जखमी) कलम ३३३ | जखमी करणे (कलम ३३२) | शासकीय कामात अडथळा (कलम ३५३) | मालमत्ता नुकसान (कलम ४२७) जाळपोळ (कलम ४३५) | गुन्ह्याचा कट करणे (कलम १२०-ब) | गैरकायद्याची मंडळी (कलम १४३) | दंगल घडवणे (कलम १४७) | हत्यारासह दंगल (कलम १४८) | दंगलीची सामायिक जबाबदारी (कलम १४९)

महिलांची डोकी फुटली, मुलांचे हातपाय सुजलेपोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक महिलांची डोकी फुटली. लहान मुलांचे हातपाय सुजले. गावातील ओट्ट्यांवर बसलेल्यांनाही घेरून मारण्यात आले. या हल्ल्यानंतरही गावकऱ्यांचे मनोबल खचलेले नाही. उलट आणखी त्वेषाने लढा द्यायचा निर्धारच गावकऱ्यांनी केला आहे.

हिरकणी बस पेटवलीछत्रपती संभाजीनगरात मध्यवर्ती बसस्थानकात उभी कोल्हापूर-औरंगाबाद हिरकणी बस अज्ञातांनी पेटवून दिली. जिल्ह्यातील एसटी गाड्याच्या ९५९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी क्रांती चौकात निदर्शने केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन दिले.  सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंद पुकारण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शनिवारी सर्वानुमते घेण्यात आला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाJalanaजालना