शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 18:42 IST

- पवन पवार वडीगोद्री ( जालना ) : मिस्टर मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुमची माझ्या समोर बोलायची ...

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : मिस्टर मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुमची माझ्या समोर बोलायची लायकी नाही. जरा अभ्यास करा, सल्लागारांकडून माहिती घ्या. आरक्षण कळण्या एवढी जरांगे यांची उंची नाही, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके मनोज जरांगेचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात बेमुदत उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे.  

हाके यांचे जरांगे यांना चर्चेचे आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं. टारगेट करून ओबीसी नेते बदनाम केले. त्यांची घरे, हॉटेल जाळली. लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी यंत्रणा ताब्यात घेणार का? तुम्ही मुख्यमंत्री व्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत, मात्र संविधानाला ठेस कुठलाच सम्राट पोहोचू शकत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे, असे आव्हान हाके यांनी जरांगेना दिले.

नक्की कोण जातीवादी? ओबीसी यांनी ७० वर्ष आरक्षण खाण्याच प्रश्न येतोच कुठे? मंडल आयोग १९९३ ला लागू झाला. ओबीसीने रिझर्वेशन खाल्ल असतं तर ओबीसीचे ४०० कारखाने ओबीसींचे दिसले असते. भुजबळांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोण राजकीय कारकीर्द उध्वस्त करणारा ? असा इशारा हाके यांनी दिला. तसेच छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, मुंडे बहिण बंधू, विजय वडेट्टीवार आम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या ४९२ जातींसाठी बोलतो. पण जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीय वादी कोण? असा सवालही हाके यांनी केला. 

आपला कोण, परका कोण ठरवातुम्हाला मुसलमानांची मते चालली, मात्र तुम्हाला जलील चालले नाही. तुम्हाला दलितांची मते चालली. मात्र तुम्हाला आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत. आपण सर्व दलित, मुस्लिम, एसटी,  ओबीसी एकत्रित या. आपला कोण, परका कोण याचा नक्कीच विचार करूया. शेतकऱ्यांची चळवळ जोशींनी लढली, शेट्टीने लढली, तुम्ही कायम सत्तेत राहिला. तुम्ही निवडणुका जिंकल्यानंतर तंत्रज्ञान आत्मसात केलं. मात्र आमच्या ओबीसींची भावना आणि वेदना इथल्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही. आम्ही ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत आहोत. विचाराने विचारांची लढाई लढली जाऊ शकते असेही हाके म्हणाले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण