शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी 'सोयरे' शब्दावर मनोज जरांगे ठाम, सरकारसोबत २४ डिसेंबरपर्यंत चर्चेस तयार

By विजय मुंडे  | Updated: December 21, 2023 18:26 IST

'सोयरे नेमके कोणाला म्हणायचे' यावरच मनोज जरांगे आणि शासनाचे शिष्टमंडळ यांच्यात पाऊण तास चर्चा

Maratha reservation ( Marathi News ) जालना : नोंदी आढळणाऱ्यांच्या आई, मामांकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, या मागणीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. शासन आवश्यक शब्दांचा कायद्यात समावेश करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल. मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर पर्यंत शासनासमवेत चर्चा करण्यास तयार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. जवळपास पाऊण तास झालेल्या चर्चेत 'सोयरे नेमके कोणाला म्हणायचे' यावरच अधिक चर्चा झाली.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, मंगेश चिवटे यांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी दुपारी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेवून कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या शासन आदेशाबाबत चर्चा केली. नोंदी असणाऱ्यांच्या सर्व परिवाराला, संबंधितांच्या नातेवाईकांना, रक्ताच्या सर्व सोयऱ्यांना आणि त्या नोंदीच्या आधारे मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी नोंद उपोषण सोडविताना घेतल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. आईकडील नातेवाईकांना लाभ देता येणार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी 'सोयरे नेमके कोणाला म्हणायचे' असा प्रश्न करीत आई, मामाकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे नमूद केले. जवळपास पाऊण तास सुरू असलेल्या चर्चेच 'सोयरे नेमके कोणाला म्हणायचे' यावरच झाली. यावरही शासनस्तरावर आणि तज्ज्ञांसमवेत योग्य ती चर्चा करून निर्णय घेवू, असे आश्वासन महाजन यांनी जरांगे यांना दिले.

जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कराकुणबी नोंदी शोधताना काही अधिकारी जातीवाद करून शासन आणि जनतेत दुवा निर्माण करीत आहेत. त्यामुळे अशा जातीवादी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली. शिवाय शांततेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या नोटिसांमुळे शासनाच्या विरोधात रोष वाढत आहे. अशा नोटिसा मागे घेण्याची मागणीही जरांगे यांनी लावून धरली.

आई, मामांकडील नातेवाईकांना लाभ नाही- गिरीश महाजनज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. नोंदी सापडणाऱ्यांच्या पत्नी, आई, मामांकडील नातेवाईकांना याचा लाभ देता येणार नाही. ते कायद्यात टिकणार नाही. शिंदे समिती, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यात कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी शासनाला काहीसा अवधी द्यावा. नोंदी असताना प्रमाणपत्र दिले जात नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करताना मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलन होणार म्हटल्यानंतर पोलिसांना दक्षता घ्यावी लागते. त्यासाठी नोटिसा दिल्या असतील, असेही मंत्री महाजन म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना