शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बोगस सेंद्रीय खत प्रकरणात व्यवस्थापकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:16 AM

येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

ठळक मुद्देमुख्यसुत्रधार अद्यापही फरार, पोलिसांच्या दोन पथकाकडून शोध

जालना : येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. बुधवारी त्याला जालना न्यायालयात हजर केले असता, ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टीलायझरच्या गोदामावर ३ मे रोजी कृषी विभागाने छापा मारुन तब्बल ६३ लाख रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त केला होता. या खतामध्ये लिंबोळी तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खतांच्या नमुन्याची तपासणी केली असता, ते सर्व बनावट आढळून आले होते. तसेच दुसऱ्या दिवशी कृषी विभागाने चंदनझिरा परिसरातील औद्योगीक वसाहत परिसरातील वरद फर्टीलायझर या बनावर सेंद्रीय खत तयार करणाºया कारखान्यावर छापा मारुन तब्बल ९० लाख रुपये किमतीचे साडेचारशे मेट्रीक टन बनावट सेंद्रीय खत जप्त केले. दोन्ही कारवाई मिळून तब्बल दीड कोटीचा बनावट खताचा साठा जप्त केला. दोन्ही बनावट कारखाने कोणाचे हे कृषी विभागाला माहित असतांना त्यांनी जाणिवपूर्वक सुरुवातीला कारखान्याच्या मालकाच्या नावाने फिर्याद देण्याचे टाळले होते. मात्र तक्रार दाखल होऊनही पोलिसाकडून तपासाला गती मिळत नसल्याने माध्यमातून यावर ताशेर ओढण्यात आले होते. यामुळे नागरिकात सुध्दा रोष वाढला होतो. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यांची गांभिर्याने दखल घेत चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या तपासाला गती आली. कोठाळे यांनी तातडीने दोन पथकाव्दारे तपास सुरु केला. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस.सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भंडागे, स्वाती शेरणागत यांनी तातडीन नांदेड जाऊन कंपनीचा व्यवस्थापक गणेश इंगळे यास मोठ्या शिताफिने अटक केली. तर वरद फर्टीलायझरच्या मालक आणि व्यवस्थापक अद्यापही फरार आहे. त्यांना पकडण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे. लवकरच इतर आरोपींना सुध्दा अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.आमदाराचा खोडाराजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने चंदनझिरा पोलिसांचे एक पथक मंगळवारी आरोपीला पकडण्यासाठी नांदेड येथे गेले होते. सदन वस्तीमध्ये अचानक पोलिसांचे पथक दाखल झाल्याने सर्वजण आवक झाले होते.संबधीत कंपनीच्या व्यवस्थापकास पकडू नये, म्हणून नांदेड येथील विद्यमान आमदाराने चंदनझिरा पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना न जुमानता आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :JalanaजालनाArrestअटकCrime Newsगुन्हेगारी