शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जालन्यातील कुपोषण रिहॅबिलिटेशन सेंटरचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:18 IST

जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे. राज्यातील पहिल्या दहा केंद्रांमध्ये जालन्यातील या केंद्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर आणि त्या केंद्रातील आहारतज्ज्ञ तसे परि चारिकांचे परिश्रम यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.जालना जिल्हा हा शिक्षणा सोबतच आरोग्याबाबतही दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या कुपोषित बालकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचे पुढचे जगणे सुकर होईल असे अति कुपोषित मुला-मुलींचा शोध अंगणवाडी ताईकडून घेतला जातो.ज्यांचे वजन हे अत्यंत कमी असेल आणि त्यांच्या दंडाचा घेर हा ११.५ सेमी. पेक्षा कमी असेल, अशांना लगेचच जालन्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले जाते. येथे अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष येथे २१०५ मध्ये सुरू झाला आहे. आता पर्यंत या चार वर्षात साधारपणे अतिकुपोषित जवळपास ५०० पेक्षा अधिक मुलांवर येथे यशस्वी उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे बालरोगतज्ज्ञ सुरजित अंभुरे आणि डॉ. भारती आंधळे यांनी दिली.जालन्यातील या केंद्रात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. या केंद्रात बालाकांसोबतच त्यांच्या आईला पोषण आहार देण्यात येतो. साधारणपणे किमान १५ दिवस या मुलांना त्यांच्या आईसह आरोग्यदायी आणि विविध जीवनसत्व असलेल्या आहाराचा पुरवठा करून मुलांचे वजन वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे आईला शंभर रूपये रोज या प्रमाणे भत्ताही दिला जातो. कुपोषणाचे प्रमाण नेमके कशामुळे वाढते, या बद्दल डॉ. अंभुरे यांना विचारले असता, ज्यावेळी एखादी महिला ही गर्भवती असेल तर तिला दर्जेदार आहार मिळत नाही. तसेच घरातील गरिबी आणि रोजगाराच्या शोधात मुलांकडे होणारे दुर्लक्ष ही कारणे आहेत. तर काही मुलांमध्ये हा आजार अनुवंशिक असतो. तर काहींना अन्य आजारांमुळे वजन न वाढण्याची कारण असल्याचे डॉ. अंभुरे म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर कुपोषण निर्मूलनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.त्यांचाच एक भाग म्हणून जालन्यात हे केंद्र सुरू केले आहे. अशा प्रकारची केंदे्र ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याचा मोठा लाभ कुपोषित बालकांसाठी होत असल्याचा दावा डॉ. अंभुरे यांनी केला. या केंद्रात पी.जे भालतिलक, लता पोफळे, एस.व्ही. ढिल्पे, पूजा अग्रवाल, पुष्पा नरोडे या डॉक्टरांना मोठी मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नSocialसामाजिक