शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांचे निधन; चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:58 IST

अ‍ॅड. मधुकर अण्णा गोसावी (८०) यांचे सोमवारी पहाटे अण्णांचे यकृताच्या आजाराने निधन झाले

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे पाईक, दांडगा लोकसंपर्क व लोकसंग्रह असलेला समाजसेवी व सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आयुष्याचा यज्ञ रचून सर्वस्वाची आहुती समर्पित करणारे अ‍ॅड. मधुकर अण्णा गोसावी (८०) यांचे सोमवारी पहाटे अण्णांचे यकृताच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा.मधुकर अण्णा गोसावी यांचा जन्म ६ आॅक्टोबर १९३८ रोजी अंबड येथे झाला. बीएस्सी. एल. एल. बी. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अण्णा यांनी आपला वकिली व्यवसाय सांभाळून संघकार्यात आपला महत्वाचा वाटा उचलला. तालुका संघचालक ते देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक असा यशाचा प्रदीर्घ प्रवास करत असताना अण्णांनी संघकार्यातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या. १९६७ साली अंबड नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. अण्णा हे डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे विश्वस्त होते. जांब समर्थ येथील रामदास स्वामींसह अन्य महान संतांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या निधनाने अंबड शहर एका थोर व्यक्तीला मुकले आहे.सद्गुरु अच्युताश्रम स्वामींची अभंग गाथा, सद्गुरु अच्युताश्रम स्वामींचे चरित्र (लीलामृत), श्री गंगाधर स्वामींचे चरित्र ( तेजोनिधी श्रेष्ठ), यादव स्वामींचे चरित्र, मत्स्योदरी देवी (अंबड) महात्म्य, आबामाऊलींचे चरित्र व आठवणी ( कल्पवृक्ष), भारतीय राज्यघटना (हिंदु ह्रदय) चा अनुवाद, आनंदी स्वामी जालना, समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी, समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठी आदींची ओवीबध्द चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. अण्णांनी मत्स्योदरी देवी अंबडचा इतिहास लेखनही केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघliteratureसाहित्य