- सुनील डोळसेमानदेऊळगाव :जालना शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला वसलेल्या मानदेऊळगाव येथे ८१ फूट उंच तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून, राज्यातील सर्वांत उंच बुद्धमूर्ती म्हणून या स्थळाची ओळख निर्माण होणार आहे. अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या जालना-जळगाव मार्गावरच हे ठिकाण आहे. या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. डोंगर खोदकामासाठी जेसीबीद्वारे दोन महिने काम होऊन १२ लाख खर्च आला. २१ फूट स्ट्रक्चर बांधकामासाठी ५५ लाख व बुद्धमूर्तीसाठी ७४ लाख असा एकूण दीड कोटी खर्च झाला आहे.
ही चार टनांची बुद्धमूर्ती छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा येथील हुबे कुशल कारागिराने घडवली आहे. बुद्धमूर्ती बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १ मार्च रोजी विविध देशांतील भिक्खू संघांनी या स्थळाला भेट देत वंदन करुन समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. असीन उत्तमतारा सयाडो (म्यानमार), पूज्य भदंत अजान अमनात (थायलंड), हृेनरेबल थुशी सीमा दा (जपान), भदंत सुगत शांतेय (बौद्ध गया) यांच्यासह नेपाळ, व्हिएतनाम, तिबेट आदी देशातील भिक्खू संघांची उपस्थिती हेाती. याप्रसंगी उद्योजक तथा स्टील कंपनीचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी भिक्खू संघाला वंदन केले.
२० एकर जागेत पर्यटनस्थळ विकसित करणारया परिसरातील २० एकर जागेत धार्मिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा मानस विलास डोळसे यांनी व्यक्त केला आहे. येथे विपश्यना हॉल, बौद्ध विहार, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, मुक्कामी थांबणाऱ्या उपासक-उपासिकांसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळाया भव्य बुद्धमूर्तीचा ३१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, खासदार डॉ. कल्याण काळे, आ. आन्ना बनसोडे, आ. अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. अब्दुल सत्तार, माजी आमदार रामभाऊ पंडागळे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती डोळसे यांनी दिली. मानदेऊळगाव हे राज्याच्या धार्मिक पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
बौद्धगया येथून प्रेरणा घेतलीमी बौद्धगया येथे भेट दिली असता, तेथील ८० फूट उंच बुद्धमूर्ती पाहून प्रेरणा घेतली. विशेषतः महाबोधी मंदिर परिसरातील भव्यतेने प्रभावित होऊन आपल्या परिसरातही अशीच दिव्य बुद्धमूर्ती उभारण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाची पूर्तता करत मानदेऊळगाव येथे ८१ फूट उंच बुद्धमूर्ती साकारली आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे दीड कोटीचा खर्च झाला आहे.- विलास डोळसे, प्रदेशाध्यक्ष, भीम कायदा संघटना
Web Summary : Mandheulgaon, near Jalna, unveils Maharashtra's tallest 81-foot Buddha statue, boosting religious tourism. The ₹1.5 crore project includes a 20-acre complex with meditation hall and accommodation. Inauguration on May 31st by Chief Minister and other dignitaries. Inspired by Bodh Gaya, the statue aims to put Mandheulgaon on the map.
Web Summary : जालना के पास मानदेऊळगाँव में महाराष्ट्र की सबसे ऊंची 81 फुट ऊंची बुद्ध प्रतिमा का अनावरण, धार्मिक पर्यटन को बढ़ावा। 1.5 करोड़ रुपये की परियोजना में ध्यान हॉल और आवास के साथ 20 एकड़ का परिसर शामिल है। 31 मई को मुख्यमंत्री और अन्य गणमान्य व्यक्तियों द्वारा उद्घाटन। बोधगया से प्रेरित, प्रतिमा का उद्देश्य मानदेऊळगाँव को मानचित्र पर लाना है।