शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 06:09 IST

Maharashtra Assembly Election 2024 : हे नवीन समीकरण आता निवडणुकीत उतरल्यामुळे महायुती आणि महाआघाडी दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : वडीगोद्री (जि. जालना) : मराठा, मुस्लीम, दलित (एमएमडी) मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा, मुस्लीम, दलित समीकरणावर एकमत झाले आहे. ही विधानसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय घेण्यात आला असून कोणत्या जागा लढायच्या आणि कोणते उमेदवार द्यायचे हे ३ नोव्हेंबर रोजी ठरणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

हे नवीन समीकरण आता निवडणुकीत उतरल्यामुळे महायुती आणि महाआघाडी दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील म्हणाले की, मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ नोव्हेंबरला कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचे हे ठरवले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे, असा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला आहे. 

सहनशक्ती संपली, आता परिवर्तनाची वेळआमची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. आम्हाला अन्यायाचे संकट परतून लावायचे आहे. आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाने जे स्वप्न पाहिले हाेते, ते स्वप्न आज साकार होणार आहे. आता आमचे समीकरण पक्के झाले असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

तिनही समाज एकत्र आल्याने बदल घडेल : जरांगेमराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाजदेखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लिम धर्मगुरू सय्याद नोमानी, आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती होती.

उमेदवारांना पाठिंबा देणार : सज्जाद नोमानीधर्मात फूट पाडणारे सत्तेमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी गुजरात स्थानांतरित केली आहे. संघ परिवार आणि त्यांचे एजंट धर्माचे नाव घेऊन भांडण लावत आहेत. सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. ही शरमेची बाब असल्याचे सज्जाद नोमानी यांनी सांगितले. आम्ही विचारपूर्वक प्रत्येक मतदारसंघात मनोज जरांगे यांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे देखील नोमानी म्हणाले.

जातनिहाय समीकरण जुळविणे सुरू : निवडणुका लढण्याचे ठरल्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांच्या ‘एमएमडी’ फॅक्टरवर स्वार होऊ इच्छिणाऱ्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांच्या आदेशाने प्रत्येक मतदारसंघातून अनेकांनी उमेदवारी दाखल केली. आता कोणता शिल्लेदार निवडणूक रिंगणात राहणार हे ४ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. उमेदवार जातनिहाय समीकरण जुळवीत आहेत

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील