राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मार्गदर्शन
जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी केशव नेटके, डॉ. ज्ञानोबा बानापुरे, अविनाश कोरडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, स्नेहा कुहिरे, एस. पी. तांदळे, शरद आडणे, अशोक कुलकर्णी, प्रवीण कल्याणकर, अतुल राहाटे, अमोल गिरी, प्रदीप निलवंत, वनिता चिंचाणे आदींची उपस्थिती होती.
साडेगाव येथे श्री राम मंदिर निधी संकलन यात्रा
तीर्थपुरी : येथून जवळच असलेल्या साडेगाव येथे अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर निधी संकलन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध जयघोषणानी परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण गावातून फिरल्यानंतर या यात्रेचा महाआरतीने समारोप करण्यात आला. यावेळी सरपंच सतीश होनडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी कारसेवकांचा सत्कार ज्येष्ठ विधीज्ञ आर. आर. कुलकर्णी, रंजीत ठाकूर, बुंदेलखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानाचा उद्देश प्रा. नाना गोडबोले यांनी सांगितला. यावेळी ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.