शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या शोधासाठी ‘लिली’ ठरतेय मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:22 IST

या तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्हा पोलीस दलातील ‘डॉग स्कॉड’मध्ये कार्यरत असलेल्या ‘लिली’ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरोडे, चोऱ्या, खुनाच्या इतर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पोलीस अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्हा पोलीस दलातील ‘डॉग स्कॉड’मध्ये कार्यरत असलेल्या ‘लिली’ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. चालू वर्षात घडलेल्या खून, दरोड्यांसह चोऱ्यांच्या ४३ प्रकरणात ‘लिली’ने पोलिसांना घटनास्थळावरून आरोपींचा मार्ग दाखविला आहे.विविध पोलीस ठाण्यांतर्गत घडणा-या खून, दरोडे, चो-यांच्या घटनानंतर श्वान पथकाला पाचरण केले जाते. जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकामधील ‘लिली’ने चालू वर्षात ४३ घटनास्थळावरून चोरट्यांसह संशयितांचा माग घेतला आहे. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथकातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एखाद्या घटनास्थळावरून कॉल आल्यानंतर हे पथक तात्काळ तेथे हजर होते. घटनास्थळावरून चोरटे, संशयित आरोपी जिथपर्यंत चालत जातात, तिथपर्यंतचा मार्ग हे श्वान पथक पोलिसांना दाखवित आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदी हद्दीत पडलेल्या दरोड्यातील दरोडेखोरांचा मागही ‘लिली’ने घेतला होता. एका ठिकाणी चोरीस गेलेल्या मोबाईलमधील सीमकार्डसह इतर वस्तू पोलिसांना सापडल्या आहेत. तर दुधी काळेगाव येथील व पारध येथील खून प्रकरणातही संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी या पथकाने पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना मदत केली आहे.दैनंदिन घेतला जातो सरावश्वानपथक विभागाचे प्रमुख फौजदार बी.एस.कबले, हॅन्डलर एस.पी. नेलवार, पी.के हावाळे व त्यांचे सहकारी ‘लिली’चा सराव घेतात. आरोग्य तपासणी, दैनंदिन खाद्य यासह इतर बाबीही हे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून असतात.दाखल होणार ‘लुस्सी’जालना पोलीस दलातील श्वान पथकात सध्या एकमेव ‘लिली’ कार्यरत आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी गरज पडली तर घटनास्थळी पोहोचताना दमछाक होते.ही बाब पाहता पोलीस दलाच्या वतीने वाढीव श्वानाची मागणी करण्यात आली होती. या मागणीला वरिष्ठांनी मंजुरी दिली असून, जिल्हा पोलीस दलात लवकरच ‘लुस्सी’ नावाचा डॉग दाखल होणार आहे.

टॅग्स :dogकुत्राJalna Policeजालना पोलीस