शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

खोट्या सह्यांद्वारे करोडोंची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:53 IST

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस या खासगी साखर कारखान्यात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलण्यात आले असून, या प्रकरणी डॉ. राख यांनी संबंधित कारखान्याच्या संचालकासह व्यवस्थापकीय संचालकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस या खासगी साखर कारखान्यात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलण्यात आले असून, या प्रकरणी डॉ. राख यांनी संबंधित कारखान्याच्या संचालकासह व्यवस्थापकीय संचालकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.निफाड येथे केजीएस शुगर अँड इंफ्रा कॉर्पोरेशन या नावाने खासगी साखर कारखाना आहे. या कारखान्यावर डॉ. संजय राख हे २००९ पासून संचालक म्हणून होते. मध्यंतरी कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे सांगून संचालक मंडळाने कॅनरा बँकेकडून कर्ज काढले. त्यात प्रथम डॉ.राख यांच्या नावावर ७४ कोटी रूपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यावेळी त्यांनी कर्ज काढण्यासाठीच्या अर्जावर जी स्वाक्षरी केली होती, ती खरी होती. मात्र नंतर या कारखान्याच्या संचालक मंडळाने २०१५ आणि २०१६ मध्ये अनुक्रमे २३ आणि ३४ कोटी रूपयांचे कर्ज पुन्हा डॉ. राख यांच्या नावावर काढण्यात आले. याची कल्पना डॉ. राख यांना नव्हती. त्यावेळी मात्र त्यांची बनावट स्वाक्षरी करून ते काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.एकूणच या कारखान्याच्या संचालक मंडळाने जवळपास ३२८ कोटी रूपयांचे व्यवहार करताना त्यात निकष डावलून ते केल्याचा संशय डॉ. राख यांना असून, या सर्व प्रकरणांची चौकशी ही उच्चपदस्थ अधिका-यांकडून व्हावी अशी त्यांची मागणी आहे. डॉ. राख यांच्या नावावर एकूण कॅनरा बँकेचे १३१ कोटी रूपयांचे कर्ज काढल्याची नोंद आहे. त्यांनी हे कर्ज परफेड न केल्याने त्यांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव का करण्यात येऊ नये म्हणून कॅनरा बँकेच्या निफाड येथील शाखेने त्यांना नोटीस बजावल्याने आश्चर्य चकीत झाले. ही नोटीस त्यांना सप्टेबर २११७ मध्ये प्राप्त झाली. नोटीस प्राप्त झाल्यावर लगेचच त्यांनी याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात केली.त्यात त्यांनी या कारखान्याचे संचालक दिनकर सखाराम बोडखे प्रसाद नामदेव कराड आणि कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक देवाशिष कृष्णपाडा मंडल यांच्यासह अन्य जणांविरूध्द २ फेब्रवारी २०१८ रोजी फसणूकीची तक्रार केली. याचा तपास सध्या जालन्यातील विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक एस.डी. बांगर यांनी दिली. या प्रकरणात सध्या डॉ. संजय राख यांच्या स्वाक्षºयांचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले. या कारखान्यात डॉ. राख यांचे ६५ लाख रूपयांचे शेअर होते. ही शेअरची रक्कम संबंधित कारखान्याने तिसºया कंपनीच्या नावारून डॉ. राख यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान डॉ. संजय राख यांनी या कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे.जे २३ कोटी रूपयांचे कर्ज कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियाकडून काढले होते, ते संचालकासह ११६ ऊसतोडीचे कंत्राट घेणाºया मुकदमांच्या नावावर काढण्यात आले. हे कर्ज काढताना संचालक मंडळ आणि बँक अधिकाºयांनी संगनमत करून आपण कर्जांच्या प्रस्तावावर समक्ष स्वाक्षरी करण्यासाठी हजर नसताना बनावट सही करून ते उचलल्याचे डॉ. राख यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे.फसवणूक झाल्यानेच तक्रार दिलीनिफाड येथील केजीएस साखर कारखान्यात आपण संचालक म्हणून राहिलो. मध्यंतरी या कारखान्याने साखर उत्पादनात चांगले काम केल्याने आपण या संचालक पदाची आॅफर स्वीकारली होती. मात्र नंतर ज्यावेळी कॅनरा बँकेतून चुकीच्या पध्दतीने माझ्या बनावट स्वाक्ष-या करून माझ्या नावावर ५७ कोटी रूपयांचे कर्ज काढल्याचे कळल्यावर आपण लगेचच संचालक पदाचा राजीनामा देऊन संबंधित कारखान्याच्या संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक मंडळाविरूध्द पोलीसात धाव घेऊन तक्रार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच या कारखान्यातील सर्व आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय अधिका-यांकडून चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रियाही डॉ. संजय राख यांनी व्यक्त केली.या गंभीर प्रकरणात फसवणूक झाल्याचे डॉ. संजय राख यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र अद्यापपर्यंत संबंधित तक्रारीत नमूद केलेल्या संशयित आरोपींना अटक करण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच हस्ताक्षर तज्ज्ञांकडून अद्याप अहवाल न आल्याने आम्ही पुढील कारवाई करू शकत नसल्याचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हा