शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या हक्काच्या मदतीसाठी कायदेशीर लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:17 IST

नैसर्गिक आपत्ती शेती सहाय्यक समितीची स्थापना करून कायदेशीर लढ्याद्वारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले, अशी अधिसूचना शासनाने काढली तरच शेतकरी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरफ) मदत मिळण्यास पात्र ठरतील. मात्र, शासन केवळ घोषणा करत असून, वैधानिक चौकटीत राहून एकही बाब पूर्ण करण्यात तयार नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती शेती सहाय्यक समितीची स्थापना करून कायदेशीर लढ्याद्वारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.लाखे पाटील म्हणाले, की या वर्षी संकटांची मालिका शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. खरिपात वेळेवर लागवड झाल्यानंतर पावसामध्ये पाच ते सहा आठवड्याचा खंड पडला. त्यानंतर परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या वेळीच पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शेतकºयांना जी मदत मिळायला हवी होती. त्या पैकी काहीच मिळाले नाही. शासन केवळ आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) मदत देण्याची घोषणा करून शेतकºयांची दिशाभूल करत आहे. वास्तविक पाहता राज्यसरकारने बोंडअळी व गारपीट नैसर्गिक आपत्ती मानून, तशी अधिसूचना काढून राज्याच्या एसडीआरएफ निधीतून तातडीची मदत शेतकºयांना द्यायला हवी होती. याबाबत वैधानिक तरतूद आहे. या फंडातून मदत दिल्यानंतरच केंद्र सरकार एनडीआरएफमधून मदत देते. नैसर्गिक आपत्ती जाहीर केली तरच पीकविमा मिळतो. परंतु विमा कंपन्या, सरकार आणि अधिकारी आपत्ती व्यवस्थापनाची कायदेशीर यंत्रणा न उभारता शेतकºयांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व बाबींचा अभ्यास करून नैसर्गिक आपत्तीपासून शेतकºयांना वैधानिक मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील १०२ तालुक्यात महाराष्ट्र राज्य नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कृषीपूरक उद्योग आणि विकास समिती स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील ६४ समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त किती शेतकºयांचे गाव निहाय पंचनामे पूर्ण झाले याच्या याद्या मिळविणे, या आधारे शेतकºयांना, गावांना आपत्तीग्रस्त प्रमाणपत्र मिळवून देणे, केंद्राच्या आपत्ती अनुदान निधीतून शेतकºयांना मदत मिळवून देणे, मार्गदर्शन करणे,शेतकºयांना हक्काचा विमा मिळवून देण्याची कामे वैधानिक चौकटीत राहून करणार असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.