शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'शिक बाबा शिक लढायला शिक'; माझ्या कविता विरोधी पक्षाला आवडतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:51 IST

कविता म्हणत म्हणत सदाभाऊ खोत मंत्री झाले - इंद्रजित भालेराव 

ठळक मुद्देबदल स्वीकारता येत नसल्याने शेतकरी अडचणीत

- विजय मुंडे 

जालना : शेतकरी संघटनेने आपल्या चळवळीत ‘शिक बाबा शिक लढायला शिक’ सारख्या कविता वापरल्या. ही कविता म्हणत सदाभाऊ खोत मंत्री झाले. राजू शेट्टी खासदार झाले. मात्र, ही कविता सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षातील लोकांना जास्त आवडते, असे सांगत मला काही मिळावं म्हणून मी कविता करीत नाही. पण समाजाला या कवितेने खूप फायदा झाल्याचे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केलं.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जालना येथे आयोजित प्रतिभा संगम साहित्य संमेलनात रविवारी कवी इंद्रजित भालेराव यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी डॉ. संजीवनी तडेगावकर, विकास वाघमारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देताना भालेराव यांनी आपल्या साहित्य जीवन प्रवासाचा थोडक्यात उलगडा केला.  शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट  आहे.  शेतकरी आत्महत्येची सुरूवात मराठवाड्यात झाली. लातूर जिल्ह्यातील हळी हंडरगुळी गावात पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर समोर आलेले वास्तव हृदयाला भिडून गेले आणि ‘शिक बाबा शिक लढायला शिक’  ही कविता तयार झाली. 

प्रश्नांची उत्तरे तरूणांचीच शोधावीतआजच्या तरूणांसमोर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली तर गुंता वाढेल. त्यामुळे तरूणांनीच त्यांच्यासमोरील प्रश्नांची उत्तरे शोधावीत. आज अनेक युवक उत्तरे, उपाय शोधत पुढे येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत नवोदित कवी, लेखकांनी सर्वांगीण साहित्य वाचनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बदल स्वीकारता येत नसल्याने शेतकरी अडचणीतगावाचा विकास करताना जे मॉडेल निवडलं, जी साधनं निवडली ती घाईघाईनं निवडली. ७२ च्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी हायब्रीड निवडलं मात्र, तेच विष झाले. आपण गावाच्या विकासासाठी जे निवडलं त्यातून झपाट्याने बदल झाले. हे बदल एकदम स्वीकारणे शक्य नसल्याने  शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मत भालेराव यांनी व्यक्त केले.आपण प्रसिध्दीसाठी हव्या त्या तडजोडी करतात? या प्रश्नाला भालेराव यांनी सडेतोड उत्तर दिले. मला काही मिळवायचं असते तर मी गत पाच वर्षे  या व्यासपीठावर स्वत:ला मिरविले असते. आज हे व्यासपीठ ज्या विचाराचे आहे त्या विचाराची सत्ता नाही. मी शासनाची, विद्यापीठाची कोणतीही आॅफर स्वीकारत नाही. कोणत्याही संस्था, संघटनेत सदस्यही नाही. मी स्वतंत्र आहे. माजी मुख्यमंत्री आर.आर.पाटील हे तीन वेळा घरी आले. माझ्या मित्राला म्हणाले, इंद्रजित भालेराव काहीच मागत नाहीत. मला काही पाहिजे असते तर मी त्यावेळीच घेऊ शकलो असतो, असे सांगताना कवी नरेंद्राच्या रूक्मिणी स्वयंवराची कहाणी सांगून कवीकुळाला बट्टा लागू नये, हे आमचे कवीकुळत्व असल्याचे भालेराव यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यFarmerशेतकरीJalanaजालना