शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीसाठी विदर्भातील मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 01:02 IST

भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे. मात्र, सहा रूपये किलोने वेचणी आणि वाहनाचे भाडे शेतकऱ्यांच्या माथी पडत आहे.भोकरदन तालुक्यात जवळपास ४२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. साधारणत: दस-यानंतर शेतक-यांच्या घरी कापूस येण्यास सुरूवात होते. त्यामुळे बहुतांश शेतक-यांची दिवाळी कापसातून मिळणा-या उत्पन्नावर साजरी होते. परंतु, यंदा परतीच्या पावसाने शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरले. पावसामुळे वेचणीसाठी आलेल्या कापसाच्या वाती तयार झाल्या. सततच्या पावसामुळे बोंडे सडल्याने उत्पादनात मोठी घट होऊन कापसाची प्रतवारी घसरली. त्यामुळे बाजारात देखील कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही.पारध परिसरात कापूस वेचणीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. अनेक शेतक-यांनी विदर्भातील मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हे मजूर कापूस वेचणीचे सहा रुपये किलोप्रमाणे दर घेत आहेत. तर वाहन भाडे वेगळे एक हजार रूपये शेतक-यांच्या माथी मारत आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने आणि कापूस वेचावयाचा असल्याने शेतकरी विदर्भातील मजुरांच्या अटी मान्य करताना दिसत आहेत. दिवसाकाठी एक मजूर ४५ ते ५० किलो कापूस वेचतो. त्याला ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. अनेक शेतकरी मजूर मिळत नसल्याने कुटुंबियांसमवेत कापूस वेचत आहेत. एकूणच यंदाचा हंगाम हा एक तर पावसाने वाया गेला, आणि आता मजुरांअभावी अडचण येत आहे.पीक नुकसानीसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे. ही मदत केवळ दोन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे. शेतकºयांना कपासासाठी एकरी ३५ हजार रूपयांवर खर्च करावा लागला आहे.त्या मानाने शासनाने दिलेली मदत तोकडी असून, एक प्रकारे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे मत अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :cottonकापूसLabourकामगारagricultureशेतीFarmerशेतकरी