शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कामासाठी मजुरांचे जि.प. समोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:33 IST

सोमवारी परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर वाढले असून, रोजगाराच्या शोधात शेकडो नागरिक शहराकडे आपला मोर्चा वळवत असल्याची माहिती कामगार नेते अण्णा सावंत यांनी सांगितले. सोमवारी परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या शेतमजूरांना गावातच काम उपलब्ध करून देण्या संदर्भातील नियोजन हे प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव या कामगारांच्या धरणे आंदोलनाने पुढे आले आहे. एकीकडे प्रशासनाकडे या संदर्भात संपर्क केला असता, ते म्हणाले की, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला सेल्फवरील कामांचे नियोजन करण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र एकीकडे जी कामे केली सुरू आहेत, ती कामे जेसीबीने उरकन्यावर कंत्राटदारांचा भर असल्याचा आरोप मजूरांनी केला. त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे याची चौकशी होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे ही जिल्हाधिकाऱ्यांनी मजूरांसाठी दिल्यास त्यांना हक्काचा रोजगार मिळू शकेल.मात्र तसे होतांना दिसत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास माव पाटोदा, लिखीत पिंप्री येथे जेसीबीने कामे करण्यार भर दिला जात आहे.यावेळी कामगार नेते मधुकर मोकळे, मारोती खंदारे तसेच अन्य कामगार नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बहुसंख्य मजूजरांनी सहभाग घेता होता. हे उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत, तो पर्यंत सुरू राहील अशी माहिती अण्णा सावंत यांनी एका निवेदनाव्दारे कळविली आहे.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले निवेदनदुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मजूर युनियन आणि लालबावटाच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे की, परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांतील मजुरांना मनरेगातून कामे द्यावीत, कामाची मागणी करूनही कामे न मिळाल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता द्यावा, प्रत्येक गावात दोन कोटी रुपयांच्या सेल्फची कामे मंजूर करावीत, परतूर तालुक्यातील आंबा येथील गाळ काढण्याच्या कामात ग्रामसेवकाची चौकशी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदagitationआंदोलन