शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

फळांचा राजा बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:28 IST

उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, फळांचा राजा आंबा जालना बाजारपेठेत दाखल झाला आहे

संजय लव्हाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, फळांचा राजा आंबा जालना बाजारपेठेत दाखल झाला आहे. नवीन ज्वारी आणि हरभरा देखील बाजारात आला असून, भाव स्थिर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या आहेत.कोकण तसेच पुणे, नगर येथून लालबाग, बदाम आंबा जालन्याच्या बाजारात दाखल झाला आहे. आंब्याचे दर मागील वर्षीप्रमाणेच म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असे आहेत. नवीन ज्वारी व हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. नवीन ज्वारी दररोज दोनशे पोते तर जुनी ज्वारी दररोज दीडशे पोते आणि नवीन हरभरा दररोज दोनशे पोते व जुना हरभरा दररोज पन्नास पोते अशी आवक आहे. जुन्या ज्वारीचे भाव २७०० ते ३२०० आणि नवीन ज्वारीचे भाव २००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. जुन्या हरभ-याचे भाव ३००० ते ३६०० आणि नवीन हरभ-याचे भाव ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटव असे आहेत. गव्हाची आवक दररोज दीडशे पोते इतकी असून, भाव १९०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.बाजरीची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, २०९ रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १३५० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज पाच हजार पोते इतकी असून, भाव दीडशे रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या तुरीचे दर ४६५० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज पंधराशे पोते इतकी असून, १०० - १५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव १२०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज पाचशे पोते इतकी असून, दोनशे रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ३५०० ते ३७५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.सोन्याचे दर ४१ हजार रुपये प्रति तोळा असे होते. चांदीचे दर ४८ हजार ५०० रुपये प्रति किलो असे आहेत. आता लग्नसराई असल्यामुळे सोने चांदीचे भाव वाढणारच आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसचा परिणाम अद्यापही भारतीय बाजारपेठेवर कायम आहे. चीन बनावटीची खेळणी त्याचप्रमाणे टीव्ही, फ्रीज, कूलर, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आवक कमी झाल्यामुळे त्यात तेजी आली आहे.गत महिन्यात खाण्याच्या तेलाचे भाव वाढले होते. पण चीनमध्ये कोरोना व्हायरसचा परिणाम तेलावर होत आहे.साखरेच्या दरात तेजी येणारसर्व साखर कारखान्यांनी त्यांच्या साखरेची निर्यात लवकरात लवकर करावी, अन्यथा पुढील महिन्यात त्यांना घरगुती वापरातील साखर विक्री करता येणार नाही, अशी तंबी सरकारने दिली आहे. त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करण्याशिवाय पर्याय नाही. निर्यात केल्यामुळे साखरेच्या दरात निश्चितच तेजी येणार आहे. सध्या साखरेचे दर ३४०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

टॅग्स :MarketबाजारMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड