शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:08 IST

बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी सुरूवात केल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. या हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत. यातील नांदेडच्या एका मिश्र खत उत्पादक कंपन्या नमुन्यांमध्ये निकष असलेले घटक आढळून न आल्याने त्या खतांची विक्री थांबवली आहे.जालना जिल्ह्यात खरिपाचे एकणू पाच लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकरी पेरणीच्या कामांना गती आली आहे.अनेक शेतक-यांनी नांगरणी यापूर्वीच केली होती. आता लहान-सहान गवताच्या काड्यांचा भुगा करण्यासाठी ट्रॅक्टरव्दारे रोटावेटर मारण्याच्या कामांना वेग आला असून, शेती कामांना ट्रॅक्टर मिळणे अवघड झाले आहे.बांध बंदिस्ती करण्यासाठी जेसीबीची कमतरता देखील जाणवत आहे. दुसरीकडे दुष्काळात अनेक शेतक-यांनी आपले पशुधन हे कवडीमोल दराने विक्री केले. त्याचाही परिणाम शेतीवर होत आहे.आज अनेकजण एकमेकांना बैलजोडी देऊन मदत करत आहेत. एक आठवडा एकाच्या तर दुस-या आठवड्यात दुस-या शेतक-यांडे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या बियाणांचे संकलन करून त्याचे नमुने हे औरंगाबाद तसेच नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, नांदेड येथील एका मिश्र खतांच्या निर्मितीच्या नमुन्यांमध्ये जे घटक खतांमध्ये असायला हवे होते. ते दिसून न आल्याने त्यांच्या खतांच्या साठ्याला विक्री बंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणनियंक एस.डी. गरांडे यांनी दिली.शेतक-यांनी बॅच जपून ठेवण्याचे आवाहनआज जरी पेरणी झालेली नसली तरी, चांगल्या पाऊस पडल्यावर येत्या १५ दिवसात पेरणीला वेग येणार आहे. ही पेरणी करताना शेतक-यांनी ज्या कंपनीचे बियाणे आणून खरेदी केली आहे, त्यावेळी त्या कंपनीचे नाव, त्या बियाणे पिशवीवर असलेला बॅच क्रमांक हा सांभाळून ठेवावा. जेणेकरून पेरणी केल्यावर जर त्या बियाणांची उगवण झाली नाही, त्यावेळी हा बॅच महत्वाची भूमिका निभावू शकतो. या बॅचमुळे नंतर संबंधित कंपनीविरूध्द कारवाई करण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीGovernmentसरकार