शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खापर हिवरा येथे दोन लाखाची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:12 IST

खापरदेव हिवरा येथे डॉ . गणेश रोडे यांच्या दुमजली बंगल्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे डॉ . गणेश रोडे यांच्या दुमजली बंगल्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोने, चांदी आणि रोख रक्कम असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील डॉ . गणेश कुंडलिक रोडे यांचे तीर्थपुरी ते अंबड मार्गावर दुमजली घर आहे. तीर्थपुरी येथील दवाखान्याचे काम आटोपून डॉ. रोडे रात्री घरी आले होते. रात्री साडेअकरा वाजता जेवण करून ते बाराच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर शतपावली करण्यासाठी गेले होते. वयोवृध्द आई घरातील हॉलमध्ये झोपलेली होती. डॉ. रोडे यांचे वडील शेतात पाणी द्यायला गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घरात कोणी जागे नसल्याने चोरट्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ९० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या एकदाणी, दोन सोन्याच्या पोत ४८ हजार रुपये दोन सोन्याचे झुंबर जोड ४१ हजार रुपये तसेच नगदी अकरा हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.चोरी करून चोरटे घराच्या बाहेर जात असताना डॉ गणेश रोडे यांना दिसले त्यांनी आरडाओरड केली. मात्र चोरट्यांनी डॉ. रोडे यांच्या दिशेने दगड भिरकावून पसार झाले. रोडे यांनी तातडीने गच्चीवरुन खाली येऊन पाहणी केली असता कपाटातील मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. डॉ . रोडे यांच्या फिर्यादीवरुन गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी