शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:25 IST

जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या यादीमध्ये या दोन्ही पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याचे जाहीर केले आहे.मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या उमेदवारीमुळे आता जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंट्याल तर परतूर मतदार संघात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात सुरेशकुमार जेथलिया अशी लढत होणार आहे. या निवडीचे काँग्रेसकडून स्वागत होत आहे.मतदारांनी संधी दिल्यास विकासासाठी कटिबध्द - गोरंट्यालजालना : राज्यमंत्रीपद मिळालेले असतानाही विद्यमान आमदारांना विकास कामे खेचून आणण्यात अपयश मिळाले आहे. जालना विधानसभा मतदार संघातील मतदारांनी संधी दिली तर मतदार संघाच्या चौफेर विकास करण्याबरोबरच मतदार संघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.गोरंट्याल यांनी सोमवारी जालना विधानसभा मतदार संघातील वरुड येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आनंदराव म्हस्के, बबनराव म्हस्के, आनंदराव शिंदे, उत्तम वाहुळे, सुभाष म्हस्के, पंडित शिंदे, रतन शिंदे, परमेश्वर घुले, भरत झारखंडे, दत्ता म्हस्के, कैलास कव्हळे, गणेश म्हस्के, देविदास क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर, मल्हारी पठारे, पंढरीनाथ म्हस्के, शिवाजी गायकवाड यांची उपस्थिती होती.गोरंट्याल म्हणाले, २००९ ते २०१४ या कालावधीत आपण आमदार असताना राज्यशासनाकडे पाठपुरावा करून अनेक विकासाची कामे खेचून आणली होती. जायकवाडी-जालना या पाणीपुरवठा योजनेबरोबरच जिल्हा महिला बाल रूग्णालय आणि इतरही अनेक विकासाची कामे ही आपल्याच कारकिर्दीत झालेली आहेत. विद्यमान आमदार राज्यात सत्तेत असून राज्यमंत्री असताना त्यांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलणे अपेक्षित होते. मात्र, विकासाची कामे आणि महत्त्वाचे प्रकल्प जालना मतदार संघात खेचून आणण्यात ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका देखील गोरंट्याल यांनी केली.यावेळी अंबादास इंगळे, संतोष गायकवाड, शंकर खंदारे, विनोद म्हस्के, रामू शिंदे, सुरेश घुले, गणेश खंदारे, भरत म्हस्के, लक्ष्मण परळकर, पांडुरंग म्हस्के, योगेश भालेकर, भरत झारकंडे, दीपक म्हस्के, रामेश्वर म्हस्के, अर्जुन म्हस्के, किशोर म्हस्के, समाधान म्हस्के, सागर काटकरे, अविनाश म्हस्के, संदीप शिंदे, अनिल घुले, दीपक म्हस्के, गौतम सातपुते, जगन वाहुळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस