शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीच्या मदतीचा ‘जालना पॅटर्न’ होतोय व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:56 IST

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून खाकी वर्दीसाठी मदतीचा हात पुढे करणारा जालना पॅटर्न व्यापक होत आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अचानक एखादे संकट आले तर खाकीतील ‘माणुसकी’ मदतीचा हात पुढे करीत आहे. जालना येथील पोकॉ संजय सोनवणे या अवलियाने गत दीड वर्षापूर्वी सुरू केलेल्या मदत मोहिमेला आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून खाकी वर्दीसाठी मदतीचा हात पुढे करणारा जालना पॅटर्न व्यापक होत आहे.अपघात असो अथवा एखादा गुन्हा असो, मोर्चा असो अथवा राजकीय सभा असो किंवा निवडणुकांचे कामकाज असो पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर जबाबदारी पडतेच! दैनंदिन कर्तव्याचे तास ठरले असले तरी केव्हा कॉल येईल आणि कर्तव्यावर जावे लागेल याचाही पत्ता नसतो! कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धावणा-या खाकी वर्दीतील एखाद्यावर संकट कोसळले तर त्याला वेळेवर मदतीचा हात मिळतोच असे नाही! मात्र, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपाधीक्षक अभय देशपांडे आदींच्या सहकार्यातून संकटग्रस्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना मदतीचा हात देण्यासाठी पोकॉ संजय सोनवणे यांनी पुढाकार घेतला आहे.गरजुंना मदतीचा हात पुढे करण्याचा प्रवास सुरू झाला तो राखीव पोलीस उपनिरीक्षक वसंत घायवट यांच्या अपघातानंतर! घायवट यांचा अपघात झाला त्यावेळी कुटुंबातील सदस्य जवळ नव्हते. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांसह समाज घटकातील इतरांनी उपचाराकामी मोठी मदत केली. ही मदतच सोनवणे यांना प्रेरणा देऊन गेली. इथून सुरू झालेल्या प्रवासात आजवर अनेकांना मदत मिळाली आहे.दिव्यांगांना अन्नदानसामाजिक कार्यक्रम असो किंवा एखाद्याचा वाढदिवस असो, हे कार्यक्रम थाटामाटात साजरे न करता दिव्यांग मुलांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी होतात.युवकांना भरतीचेप्रशिक्षणपोलीस अधिकारी, कर्मचा-यांसाठी पोलीस दलाच्या वतीने जीम तयार करण्यात आली आहे. या जीममध्ये पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाºया युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय ग्राऊंडबाबतही संजय सोनवणे युवकांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकJalna Policeजालना पोलीस