शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जालना-पैठण जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून पैठण ते पाचोड तसेच पाचोड ते अंबड या मार्गावरील जवळपास पाच ते सात व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यंतरी जालना पालिकेने पुढाकार घेऊन पैठण ते पाचोड आणि पाचोड ते अंबड या दरम्यानच्या जवळपास १८ शेतकºयांवर पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तसेच व्हॉल्व्हला गळती लागून नये म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरून अद्ययावत व्हॉल्व्ह बसविण्यात येणार होते. त्यासाठी जालना पालिकेने विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असे असताना अद्यापही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आहे.दरम्यान, जालना शहराला सध्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या घाणेवाडी तलावात मार्च महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे आगामी काळात जालनेकरांना सर्वस्वी जायकवाडीतून येणाºया पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पाणीचोरी : पथकाची कारवाईपैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याला पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रूपये खर्च करून २०१२ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतूनही जुन्या शहागड योजनेप्रमाणेच पाणीचोरीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या अचानक तपासणीत धक्कादायक बाबी उघडकीस आली होती.जायकवाडी धरणातून जालन्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला भगदाड पाडून तसेच व्हॉल्व्हला छिद्र पाडून त्यातून शेतकरी पाणी चोरी करत होते. या शेतक-यांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण