शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जालना : अखेर तुरीसाठी मिळाली जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:52 AM

हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध झाल्याने आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी गुरूवारी पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध झाल्याने आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी गुरूवारी पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची नाफेडने दखल घेत तूर खरेदी सुरू केली आहे.जिल्ह्यातील शासकीय गोदामात गत वर्षाची १ लाख क्विंटल पेंक्षा जास्त तूर गच्च भरून आहे. परिणामी यावर्षीपासून हमीभावाने खरेदी करण्यात आलेली १२ हजार क्विंटल तूर जागेअभावी ठेवावी कोठे असा प्रश्न वखार महामंडळाला पडला होता. सुरुवातीला खरेदी केलेली तूर बसस्थानक परिसरातील सिटीवेअर हाऊस आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवण्यात आली होती. मात्र त्या गोदामाची क्षमता संपल्याने जागेअभावी तूर खरेदी बंद ठेवण्यात आली होती. जागाच नसल्याने दिवसभरात केवळ तीन-चार शेतक-यांकडून तूर खरेदी करण्यात येत होती. मात्र तूर खरेदी मंदावल्याने जडाई माता एजन्सीची देखील पंचाईत झाली होती. शेतकरी दररोज हमीभाव केंद्रावर चकरा मारून कर्मचा-यांना धारेवर धरत होते. मात्र तूर ठेवायला जागाच नसल्याने अखेर १४ मार्चपासून तूर खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली होती. शेतक-यांची गैरसोयीबाबत लोकमतने गुरुवारी ‘तूर ठेवण्यासाठी कोणी जागा देता का.. जागा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करताच जिल्हा मार्केटींग विभाग आणि वखार महामंडाच्या अधिकारी यांनी तातडीने हालचाली करून तूर ठेवण्यासाठी भोकरदन मार्गावर असलेल्या गोदामात जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी पूर्ववत झाली. पहिल्याच दिवशी ११ शेतक-यांची १३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र