शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सौरपंप जोडणीत जालना जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:42 IST

शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत १०७ सौरपंपांची जोडणी करण्यात आली आहे.प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असते. आणि त्यासाठी कृषीपंपाना शाश्वत वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे. ही बाब हेरुन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा तसेच वीजबिलापासून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरु केली आहे. या योजनेला मराठवाड्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.यात अर्ज करण्यापासून ते सौरपंप जोडणीतही जालना जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जालना जिल्ह्यातील २७ हजार ७५६ शेतक-यांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गातून १६६२ एसटी प्रवर्गातून १६७, खुल्यामधून ८ हजार ६०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ७४७ शेतक-यांना कोटेशन वाटप केले आहे. तर ५ हजार २८० शेतक-यांनी सौरपंपासाठी पैसे भरले आहेत. अर्जाची छाननी करुन आतापर्यंत १०७ शेतक-यांना कृषीसौरपंपाची जोडणी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून जालना जिल्ह्याने सौरपंप जोडणीत अव्वल आहे. एक वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जाईल.एजन्सीकडून जोडणीस होतोय विलंबया योजनेत अर्ज केलेल्या शेतक-यांना सौरपंप पॅनल, विद्युत मोटरीसह इतर साहित्य खरेदीसाठी महावितरणे राज्यभर एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून शेतक-यांना साहित्याची खरेदी करावी लागते. मात्र अनेक शेतक-यांनी संबंधित एजन्सीकडे पैशाचा भरणा केलेला असतांना साहित्य वाटपात एजन्सीकडून विलंब होत असल्याचे शेतक-यातून ओरड होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना