शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हा रूग्णालयाकडून १४ रूग्णवाहिकांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:51 IST

जिल्हा रूग्णालय प्रशासनाने १४ रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा रूग्णालयासह इतर रूग्णालयातील अपुऱ्या रूग्णवाहिकांमुळे रूग्णांचे होणारे हाल याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा रूग्णालय प्रशासनाने १४ रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. शिवाय सोनोग्राफी मशीन खरेदीसाठीही पाठपुरावा केला जात आहे.जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णवाहिकांचा मोठा अभाव आहे. १०८ च्या रूग्णवाहिकांची संख्याही अपुरी आहे. त्यात कार्यरत रूग्णवाहिका या १५ वर्षांपूर्वीच्या असून, अनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे या बंद असतात. परिणामी खासगी रूग्णवाहिकांचा आधार घेऊन रूग्णांना इतर रूग्णालयात जाण्याची वेळ येत होती. याबाबत ‘लोकमत’ने ‘रूग्णांचा ‘गोल्डन आवर’ जुनाट रूग्णवाहिकेवर!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा रूग्णालय प्रशासनाने नवीन रूग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. यात जिल्हा रूग्णालयासाठी दोन, महिला रूग्णालयासाठी दोन, उपजिल्हा रूग्णालयासाठी एक व ग्रामीण रूग्णालयांसाठी ९ रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. या रूग्णवाहिका खरेदीसाठी साधारणत: पावणेदोन कोटीवर रक्कम लागणार आहे.या सोबतच जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयांसाठी चार नवीन सोनोग्राफी मशीन खरेदी करता याव्यात, यासाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे.लहान बालकांसाठी व्हेंटलेलेटर मशीनसह इतर आधुनिक सोयी-सुविधांसाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीसह इतर शासकीय फंडातून ही रक्कम उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या जिल्हा रूग्णालयासह इतर रूग्णालयातील सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयासह इतर रूग्णालयांमध्ये नवीन खाटांची गरज आहे. काही ठिकाणी खाटांची संख्या आणि रूग्ण संख्या यात सतत तफावत दिसून येते. तर काही ठिकाणी खाटा जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे नवीन २०० खाटांसाठी निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.कार्डिअ‍ॅक रूग्णवाहिकेचा प्रस्ताववरिष्ठ स्तरावरून आलेल्या निर्देशानुसार जिल्हा रूग्णालय प्रशासनाने नवीन दोन कार्डिअ‍ॅक रूग्णवाहिका मिळाव्यात, म्हणून यापूर्वीच वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केलेला आहे. वरिष्ठ स्तरावरून याला मंजुरी मिळेल, असे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्यGovernmentसरकार