शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात ‘समृद्धी’ महामार्गासाठी १३३ हेक्टरचे होणार थेट भूसंपादन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:19 IST

जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे थेट भूसंपादन केले जाणार आहे.

ठळक मुद्देसंपादनाची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यामुळे शेतकरी व प्रशासनातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

- बाबासाहेब म्हस्के 

जालना : जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे थेट भूसंपादन केले जाणार आहे. तशी अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यामुळे शेतकरी व प्रशासनातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम लवकर सुरू करायचे असल्याने शासनाला त्यासाठी आवश्यक जमीन ताब्यात घेण्याची घाई झाली आहे. या महामार्गासाठी जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९, तर बदनापूर तालुक्यातील  १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमीन खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ७५ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तर १३३ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे.

यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी व वाढीव मोबदल्यासाठी काही शेतकऱ्यांनी खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. दोन्ही तालुके मिळवून केवळ २५ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादन कायद्यानुसार करण्याची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाने २५ मे रोजी काढली आहे. भूसंपादन कायदा लागू झाल्यास शेतकऱ्यांना नियमानुसार केवळ चारपट मोबदला मिळणार आहे. शेवटची संधी म्हणून शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत थेट वाटाघाटीने खरेदी करून घ्यावी, असे सूचनेत नमूद आहे. शासन जमीन घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अधिसूचना प्रसिद्धी करण्यात आली आहेसमृद्धीमहामार्गासाठी १३३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन बाकी असून, ही जमीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ताब्यात घेण्याची अधिसूचना प्रसिद्धी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना थेट वाटाघाटीने रस्ते विकास महामंडळास जमीन विक्री करायची आहे, त्यांनी तशी पूर्व संमती देवून खरेदीखताची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करून घ्यावी. यात काही  बदल झाल्यास तशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली जाईल. - ए. व्ही. अरगुंडे , प्रादेशिक अधिकारी रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेती