शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:42 IST

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.औरंगाबाद परिमंडळा अंतर्गत आता वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांनी दिली. गेल्याच आठवड्यात भरारी पथकाने जिल्ह्यात मोठी यशस्वी कारवाई केल्या नंतर पुन्हा एकदा वीज चोरांविरूध्द धडक मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी आणि विजेची गळती यामुळे जालना डी झोनमध्ये गेलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भारनियमन हे नित्याचीच बाब झाली आहे. हे थांबवून जे वीज ग्राहक नियमितपणे बिल भरतात, त्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीजेची थांबविणे हा एक महत्वाचा पर्याय असल्याचे हुमणे म्हणाले. जालना जिल्ह्यात वीज वितरणचे दोन विभाग पडतात. जालना -१ विभागात ३५ तर जालना-२ विभागामध्ये ९१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरवायची आहेत.मोहिमेत सातत्य राहणारजालना जिल्हा हा वीजचोरीसाठी यापूर्वी पासूनच नावाजलेला आहे. भरारी पथकानेही अनेक धनदांडग्यांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केल्याने आधीव खळबळ उडाली होती. आता पुन्हा या विशेष मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाले आहेत. एकूणच जे वीजचोरी करत असतील त्यांनी निदान आता तरी ती थांबवावी असे आवाहन अधीक्षक अभियंता हुमणे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून वीज चोरीची विशेष शोध मोहीम सुरू आहे. या अंतर्गत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य वीज वाहिनीवरून आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून आले. हे आकडे जप्त केल्याने त्यांचा खच जमला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी