शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात भाजप तालुकाध्यक्ष निवडीत २० पैकी केवळ तीन अध्यक्षांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:06 IST

अनेक ठिकाणी कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने रखडल्या निवडी

जळगाव : भाजप तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात तालुकानिहाय कार्यक्रम निश्चित होऊन २२ ते २६ डिसेंबरपर्यंत प्रत्येक तालुक्यात बैठका होऊनही २० पैकी केवळ तीनच तालुकाध्यक्षांची निवड झाली आहे. अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने व कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने बहुतांश ठिकाणी निवड होऊ शकल्या नाही. त्यामुळे या संदर्भात आता कोअर कमिटी निर्णय घेणार असून त्या विषयी जिल्हा पातळीवर बैठक होणार आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लांबत असून डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप तालुकाध्यक्षांतीत निवड पूर्ण झालेली नाही. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत होणारी जिल्हाध्यक्ष निवडही लांबणीवर पडली आहे. या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत तालुकाध्यक्ष निवडीच्या तारखा ठरविण्यासंदर्भात १८ रोजी जळगाव येथे भाजप कार्यालयात बैठक झाली व तालुकाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात २२ ते २६ डिसेंबरपर्यंत सर्व तालुकाध्यक्षांची निवड होणार होती. मात्र २६ रोजी शेवटच्या दिवशीदेखील भुसावळ शहर व ग्रामीणची निवड होऊ शकली नाही.निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २२ ते २४ डिसेंबर या तीन दिवसादरम्यान एकाही ठिकाणी तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. अखेर २५ डिसेंबर रोजी रावेर, यावल व जामनेर या तालुकाध्यक्षांच्या निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीत या तीनच तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली. यात यावलच्या तालुकाध्यक्षपदी योगेश फेगडे, जामनेरला चंद्रकांत बाविस्कर (फेर निवड) व रावेर तालुकाध्यक्षपदी राजन लासूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माघार घेण्यास कोणी तयार नाहीचाळीसगाव, जळगाव ग्रामीण, भुसावळ शहर व ग्रामीण या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने व कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने तेथे तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. या संदर्भात कोअर कमिटीकडे निर्णय सोपविला असून या साठी जिल्हा पातळीवर बैठक होणार आहे. त्यानंतर या निवडी होतील.बोदवड व मुक्ताईनगरात खडसेंच्या निर्णयाची प्रतीक्षाबोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात बुथ समित्या अपूर्ण असून तेथे त्या पूर्ण करण्यात आल्या. मात्र यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रतीक्षा होती. आता खडसे जिल्ह्यात आले असून या दोन्ही तालुक्यातील निवडीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली.बुथ समित्या अपूर्णचोपडा तालुक्यात बुुथ समित्या पूर्ण नसल्याने त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष निवड होऊ शकली नाही. अशाच प्रकारे अमळनेर येथेही निवड रखडली असून तेथे २८ रोजी निवड केली जाणार आहे. अशीच स्थिती बहुतांश ठिकाणी असल्याने तालुकाध्यक्षांची निवड रखडल्या आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव