शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:10 IST

जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जालना : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालन्यात घडली घडली.  सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील  आरोपी सईद खान उर्फ बिलाल याकूब खान (20, रा. कबाडी मोहल्ला, जालना) याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता आरोपी बिलाल याकूब खानला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीतून चौकशीसाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पिंक मोबाईलच्या कार्यालयात आणण्यात आले होते. चौकशी सुरू असतांना आरोपी सईद खान याने हातकडीसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारून, पहिल्या मजल्यावरुन पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेत उडी मारली.

जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला आहे. या घटनेमुळे कदीम जालना पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पिंक मोबाईलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा बनसोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात सईद खान याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी