शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: ट्रॅक्टर कालव्यात उलटून शेतकऱ्याचा मृत्यू; घरातील कर्ता गेल्याने कुटुंब उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:26 IST

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारातील घटना

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, मंगळवारी ( दि. २४ )  दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाला. अण्णासाहेब नामदेव गव्हाणे ( ३७, रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी अण्णासाहेब गव्हाणे हे मंगळवारी सकाळी बटईने केलेल्या शेतात कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. काम आटोपून परत येत असताना घुंगर्डे हादगाव ते तीर्थपुरी रोडवर नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर रोडच्या शेजारील पाण्याच्या चारीमध्ये उलटला. यामध्ये गव्हाणे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबतचा गोपाल विष्णू पवार ( 13  रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) हा गंभीर जखमी झाला.

माहिती कळताच या अपघातस्थळी घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ट्रॅक्टर खाली दबलेला गव्हाणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. तर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी अंबड येथे हलवण्यात आले आहे. मयत अण्णासाहेब गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गव्हाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना