शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात २ तहसीलदारांसह ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:03 IST

३८ ग्रामसेवक, १७ कृषी सहायकांचे खुलासे असमाधानकारक

जालना : जिल्ह्यात २०२२ ते २०२४पर्यंत वाटप करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानात घोटाळा झाल्याचे यावर्षी जानेवारी महिन्यात समोर आले होते. याप्रकरणी सध्या दोन तहसीलदार आणि ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू आहेत. तर, २१ तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ३८ ग्रामसेवक व १७ कृषी सहायकांनी समाधानकारक खुलासे दिलेले नाही. दरम्यान, अनुदान वाटप घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांची मंगळवारी विधान परिषदेत जाहीर केले आहे.

जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या अनुदानात आर्थिक व्यवहार झाल्याप्रकरणी आमदार राजेश राठोड यांनी तारांकित प्रश्न विधान परिषदेत मांडला होता. याप्रकरणी उत्तर देताना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांनी या घोटाळ्यातील ५७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. मात्र, घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीनंतरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अंबड आणि घनसावंगीचे तत्कालिन दोन तहसीलदारांसह ५७ कर्मचाऱ्यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. २१ तलाठ्यांवर निलंबनाच्या कारवाईनंतर प्रशासनाने ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना खुलासे सादर करण्यास सांगितले होते. परंतु, अद्याप या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.

तीन सदस्यीय चौकशी समितीअनुदान वाटप घोटाळा ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहायकांच्या संगनमताने झाला असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यामध्ये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे. घोटाळा झाल्याचे समजल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे. यानुसार, बनावट लाभार्थी आणि कागदपत्रे तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉगिनचा वापर करून डिजिटल सिस्टममध्ये फेरफार करण्यात आला असल्याचे उघड झाले होते.

कर्मचाऱ्यांचे खुलासे मिळेनादरम्यान, घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेल्या ३८ ग्रामसेवक व १७ कृषी सहायकांना नोटीस पाठवून खुलासे मागविण्यात आले होते; परंतु या कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात गोलमाेल खुलासे सादर केले होते. यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा खुलासे सादर करण्यास सांगण्यात आले आहे; परंतु अद्याप प्रशासनाकडे हे खुलासे सादर केलेले नाहीत. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :JalanaजालनाCorruptionभ्रष्टाचारRevenue Departmentमहसूल विभाग