शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: वाळूच्या ढिगाऱ्यावरून वाद, पोलिस ठाण्याबाहेरील मारहाणीत जखमी तक्रारदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:38 IST

जाफराबाद ठाण्यासमोरील घटना : या प्रकरणात दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : घराशेजारी पडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावरून झालेल्या मारहाणीतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जाफराबाद पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर सोमवारी रात्री घडली. युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलिस व संशयितांवर आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकरणात दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर बाबुराव सोनुने (वय-३५ रा. सावरखेडा) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात दीपक बाबुराव सोनुने यांनी फिर्याद दिली आहे. सोनुने यांच्या घराच्या पाठीमागे सुखदेव सोनुने यांची बांधकामासाठी आणलेली वाळू पडलेली आहे. येण्या-जाण्यास त्रास होत असल्याने दीपक व त्यांची आई हे सोमवारी रात्री सांगण्यास गेल्या असता. राजू सुखदेव सोनुने, विजू सुखदेव सोनुने यांनी शिवीगाळ करून वाद केला. त्यानंतर दीपक हे जाफराबादेत तक्रार देण्यासाठी आले. दोन्हीकडील मंडळी आल्याने पोलिसांनी सर्वांनाच ठाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी राजू सोनुने, विजू सोनुने यांनी परमेश्वर सोनुने यांच्या डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जालना येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना परमेश्वर सोनुने यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांचा आक्रोशयुवकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जाफराबाद ठाण्यात जमा झालेल्या नातेवाईकांनी कारवाई होईपर्यंत मृतदेह हाती घेणार नाही. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीची चौकशी करून कारवाई करावी यासह इतर मागण्या लावून धरल्या. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे खंडण करीत सीसीटीव्हीत अशी कोणतीच घटना दिसत नसल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपींना अटक केल्याचेही सांगण्यात आले.

जुळ्या मुलांचे छत्र हरवलेसोनुने यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. परमेश्वर यास दोन जुळे अपत्य असून, एक मुलगा, एक मुलगी आहे. दोन्ही वयाने ३ वर्षाचे असून, या चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांच्या मायेचे छत्र हरवले आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी