शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 22:50 IST

जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. पैठण ते जालना हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या शंभर किलोमीटरमध्ये ही जलवाहिनी जवळपास १९ गावांमधून जाते. यामुळे या गवांना अर्धा इंच पाईपमधून पाणी देण्याची व्यवस्था जालना पालिकेने केल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहराला पाणी समस्येने ग्रासले होते. मध्यंतरी विदर्भातील खडकपूर्णा धरणातून जलवाहिनी टाकून पाणी आणण्याच्या योजनेवर विचार झाला होता. परंतु तेथे जालन्यासाठी जे पाणी धरणात राखून ठेवावे लागते त्याचे आरक्षण नव्हते. त्यानंतर मग पैठण येथील जायकवाडी धरणाचा पर्याय समोर आला. त्यासाठी एका खाजगी सर्वेक्षण कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्या एजन्सीने जायकवाडी धरणातून पाणी आणतांना ते शिरनेर टेकडीपासून जालन्याला आणावे असा एक आणि नंतर अंबडहून हे पाणी जालन्यात नेता यईल असा अहवाल दिला होता. त्यामुळे अंबड येथून ही योजना आणण्याचे ठरले.ही योजना आणताना पुन्हा पूर्वी प्रमाणेच अंबड शहराचा मुद्दा उपस्थित झाला. पूर्वी जालना शहराला शहागड योजनेतून जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा होत होता. तो आता जायकवाडी धरणातून होत आहे. अंबड पालिकेने पुन्हा या पाणी मिळण्याच्या मुद्द्यावर हक्क सांगितल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. अंबडने वीजबिल आणि पाण्याचे बिल देणे अपेक्षित आहे. परंतु, त्याची पूर्तता होत नसल्याने जालन्याला मुबलक पाणी मिळणे अवघड होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी