शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला महत्त्व देणे गरजेचे - धनाजी गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:24 IST

भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राम मंदिर, पाकिस्तान आणि अन्य अनेक भावनिक मुद्यांवर भाजपकडून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळणे गरजेचे आहे. भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.डाव्या आघाडीतर्फे मंगळवारी डॉ. भगवानसेवा मंगल कार्यालयात श्रमिक जनतेच्या जाहीरनाम्याचे जाहीर वाचन करण्यात येऊन त्यांवर विचार मंथन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव राख हे होते. यावेळी कामगार नेते आसाराम लोमटे, प्रा. संजय लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. लकडे यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.पुढे बोलताना धनाजी गुरव यांनी चौफेर मांडणी केली. एकूणच श्रमिकांचे कैवारी म्हणून घेणारे हे केंद्र आणि राज्य सरकार केवळ जुमले बाजी करते. अर्थसंकल्पात लोक कल्याणकारी योजनांची जंत्री वाजवायची आणि प्रत्यक्षात त्यावर कवडीही खर्च करायची नाही, अशी अवस्था या सरकारांनी केली आहे. लोकशाहीला आता भारतात पर्याय नाही, परंतु ती चांगली लोकशाही हवी. केवळ मूठभरांच्या हाती सत्ता असल्याने त्यांना हवे तसेच ते वदवून घेत आहेत.पाकिस्तानवर हल्ला करून त्याचा निवडणुकीत उपयोग होत असेल तर, ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही देखील देशप्रेमी आहोत. परंतु राम मंदिर आणि पाकिस्तानचे भावनिक मुद्दे जनमानसावर बिंंबवून गंभीर प्रश्नांपासून निवडणूक दूर नेली जात आहे. हे त्यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही गुरव यांनी केला. श्रमिकांनी देखील त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आसाराम लोमटे यांनी सिंचन, शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर लोमटे यांनी विचार मांडले. महाराष्ट्रात माथाडी, रोजगार हमी आणि अन्य अनेक कायदे हे कामगार संघटनांनी एकत्रित येऊन केल्यानेच त्यांचे आज मोठे महत्त्व आणि गरज निर्माण झाली आहे. आज जायकवाडीतील पाणीपातळी शून्य टक्क्यांवर आली असून, नगर, नाशिक मधून आपल्याला पाणी देण्यास विरोध होणे ही बाब निश्चित एकसंध महाराष्ट्राला न शोभणारी असल्याचे प्रतिपादन संजय लकडे यांनी केले.यावेळी माजी मंत्री शंकरराव राख यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी सद्यस्थितीवर परखड मत मांडून देशातील एकूणच प्रचार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा समाचार घेतला. यावेळी कामगारनेते अण्णा सावंत, प्रा. नारायण बोराडे, प्रा. राजकुमार वलसे, डॉ. रमेश अग्रवाल, यशवंत सोनुने, अनिल मिसाळ, संदीप शिंदे, प्रा.सुभाष देठे, शेख मुजीब, शेख शाकीर आदींची उपस्थिती होती.भांडवलदारांसाठी पायघड्यादेशाचे पंतप्रधान म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल पूर्णपणे डबघाईला आलेले असताना अंबानींच्या मोबाईल कंपनीला जी मदत केली आहे ती निश्चित चुकीची म्हणावी लागेल. शिक्षण, आरोग्य, निवारा पुरवणे हे कल्याणकारी राज्याचे ध्येय आहे. असे असताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आम्हाला शाळा चालवणे परवडत नसल्याने आम्ही त्या बंद करत असल्याचे सांगतात शाळा चालवणे म्हणजे सरकारने काय उद्योग समजला आहे काय, असा सवालही गुरव यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण