शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बलिदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञता बाळगणे नागरिकांचे कर्तव्य- देवकर्ण मदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:58 IST

भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अलीकडच्या काळात देशभक्तीचा ज्वर वाढला आहे राष्ट्र निष्ठा, देशभक्ती अवश्य हवी. पक्ष, विचारधारा कुठलीही असो; भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.आनंद फाऊंडेशनतर्फे मसाप जालना शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन व कवि संमेलन सोहळा मंगळवारी महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्या सभागृहात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे होते. आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ शिवाजी मदन, डॉ. नारायण बोराडे, डॉ. आदिनाथ पाटील, डॉ. कार्तिक गावंडे, डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. दिलीप अर्जुने डॉ. भारत खंदारे, डॉ.राजेंद्र उढाण, प्राचार्य रामलाल अग्रवाल, प्रा संदीप पाटील, संजय लहाने, प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. देवकर्ण मदन यांनी पैसे कमावण्याची वाढलेली तृष्णा, पालकांचा स्वार्थासाठी होत असलेला वापर, विस्कळीत कुटुंब व्यवस्था इ. विषयांवर भाष्य करतांना जागतिकीकरणाच्या लाटेत पैसा हेच साध्य झाले असल्याने खरा आनंद हिरावला असल्याची खंत व्यक्त केली, जिल्ह्यास दर्जेदार साहित्य परंपरा असून, म.सा.प.चे पदाधिकारी साहित्य चळवळ बळकट करतील असा विश्वास मदन यांनी व्यक्त केला.सत्कारास उत्तर देताना मसाप चे सचिव पंडित तडेगावकर म्हणाले की, म.सा.प. ने समाजातील प्रत्येक घटकांचा आवाज शासन, न्यायालया पर्यंत पोहोचविला आहे, प्रसंगी आंदोलने केली. सर्वांच्या सहकार्याने नवीन सभासद जोडून नव लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. त्यांना उभे करण्यास मसाप प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही तडेगावकर यांनी दिली.डॉ. ज्योती धर्माधिकारी लिखित विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी ग्रंथ निर्मिती, संशोधन व ग्रंथाविषयी अनुभव कथन केले. प्रास्ताविकात डॉ. नारायण बोराडे यांनी निखळ सामाजिक कार्यासाठी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली असून, राबविलेले व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कार्तिक गावंडे यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्यानंतर शम्स जालनवी, आबा पाटील ( बेळगाव) संतोष नारायण कर (परभणी) धनंजय गव्हाले ( सिल्लोड) यांचे बहारदार कविसंमेलन झाले. यावेळी रसिकांची उपस्थिती होती.यांचा झाला सत्कार...मसाप जालनाचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर, कोषाध्यक्ष कैलास भाले, सहसचिव ज्योती धर्माधिकारी, सदस्य डॉ.गजानन जाधव, सुनंदा तिडके, गोविंदप्रसाद मुंदडा, एस. एन. कुलकर्णी, विलास भुतेकर, शिवाजी कायंदे, प्रतिभा श्रीपत, दादासाहेब गि-हे, राम गायकवाड, उध्दव थोरवे, सुरेखा मत्सावार, शशिकांत पाटील, जगन्नाथ खंडागळे, विमल आगलावे, ज्ञानदेव पायगव्हाणे, सुलभा कुलकर्णी, सुधाकर जाधव, भगवंत ठाले पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती नारायण बोराडे यांनी दिली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक