शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात 'आयपीएल बेटिंग आॅन व्हील'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:01 IST

कारमध्ये सट्टा चालविणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात कारमध्ये सट्टा चालविणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. मनोज रमेशचंद्र अग्रवाल (३९, रा. कडबीमंडी) असे सट्टाबुकीचे नाव असून त्याच्याकडून ५ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरात मनोज रमेशचंद्र अग्रवाल हा व्यापारी एका महागाड्या कारमधून चालता- फिरता आयपीएलच्या सामन्यावर सट्टा चालवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून अग्रवाल यास मोबाईलवर सट्टा खेळताना व खेळवितांना पंचशील हॉस्पिटल जवळ असलेल्या त्याच्या कारमध्ये (एमएच-२१. एएक्स.४५९) रंगेहाथ पकडले.सदर कारची व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल आढळून आले. सदर मोबाईलची पाहणी केली असता, मोबाईलमध्ये अनिल गव्हाणे, संदीप आमले (दोघे रा. रा. हिसवन, ता. जि. जालना), कैलास साकूंडे (रा. दुधना काळेगाव) यांच्या सोबत मोबाईल कॉल, एसएमएस व व्हॉटसअ‍ॅपद्वारे आयपीएलमध्ये चालू असलेल्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची समोर आले. राज्यस्तरीय बुकी नितीन अग्रवाल (रा. नागपूर) याच्या संपर्कात असल्याचे अग्रवाल त्याने सांगितले. याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून एक कार, तीन मोबाईल, असा ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज अग्रवाल याच्याविरुद्ध दोन वषार्पूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. अग्रवाल याचे कडबी मंडी भागात अग्रवाल सॅनिटेशन व हार्डवेअर नावाचे दुकान आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, कर्मचारी कुरेवाड, कायटे, गडदे, देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, मदन बहुरे यांनी केली.तीन वर्षात अकरा बुकींवर कारवाईभारतात आयपीएलचा मोठा क्रेझ आहे. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टे बाजी होते. यावर बंदी असतानाही बुकी सट्टे लावतात. जालना शहरातही मागील तीन वर्षांपासून याचे प्रमाण वाढले आहे. २०१७ साली शहरात प्रथमच एका बुकीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर २०१८ मध्ये सट्टा लावणाऱ्यांमध्ये वाढ झाली. २०१८ मध्ये पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले होते. तर २०१९ मध्ये आतापर्यंत २ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.

टॅग्स :IPL 2019आयपीएल 2019Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस