शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:01 IST

मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बुधवारी ‘सावित्रींच्या लेकी घरोघरी, शोध ज्योतिबांचा जारी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे या होत्या. यावेळी डॉ. स्मिता चव्हाण, अनिता जाधव, व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहूळे, मिलींद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव प्रमुख उपस्थिती होती.अश्विनी सातव म्हणाल्या, परंपरेच्या जोखडांविरूध्द सावित्रीबाई उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या जोतिबांची आज गरज आहे. आयटी क्षेत्रातील तरुणी पोथी-पुराणात अडकलेल्या आहेत. महिलेला माहेरी, सासरी कुठेच स्थान नसते. केवळ नऊ महिन्यांचा गर्भच तिची संपत्ती आहे. मुलगा होत नाही तर सोडून दे, अशी हिणवणी केली जाते. सरकार एकीकडे बेटी-बचावचा नारा देत असतांना त्यांचेच लोक अत्याचार करत आहेत. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे सहजीवन प्रत्येक महिलेस लाभावे, तेव्हाच खरी समता येईल. स्त्री कुणाच्या मालकीची आहे, ही मानसिकता बदलावी लागेल. काळजी वाटूच नये असा समाज निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पार्वताबाई रत्नपारखे यांनी व्याख्यानमाला यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ. स्मिता चव्हाण यांनी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. अनिता जाधव यांनी समतेचा भारत उभा करण्यासाठी महिलांनी तयार व्हावे असे सांगितले. वैशाली गरड यांनी सूत्रसंचालन केले. आदर्शा शरणागत यांनी आभार मानले.

टॅग्स :WomenमहिलाSocialसामाजिक