जालना : आरोग्य विभागाला गुरूवारी ८२६ जणांच्या कोरोना तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ८६ जणांच्या ॲँटिजन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आरटीपीसीआरच्या ७३८ तपासणी अहवाल सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पॉझिटिव्हिटी रेट ०.८ आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा समावेश आहे. जालना तालुक्यातील नेर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथील एकाचा व बुलडाणा जिल्ह्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अलगीकरणात चौघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६१ हजार ६८६ वर गेली असून, त्यातील ११८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ४२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रूग्णांची संख्या घटली असली तरी नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करण्यासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.