शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राकाँकडून इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:55 IST

जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. त्यात बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन मतदारसंघाचा समावेश आहे. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली. घनसावंगी मतदारसंघातून एकमेव विद्यमान आ. राजेश टोपे यांचेच नाव पुढे आले असून, बदनापूर या राखीव मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक होते. भोकरदन मतदारसंघातून माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच परतूरचे सभापती कपिल आकात, माजी जि.प. सदस्य श्रीरंग पाटील यांचा समावेश होता.येथील हॉटेल बगडियामध्ये सकाळी या मुलाखती पार पडल्या. आगामी विधानसभानिवडणूकीच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी घेतली जात आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लढणार असल्या तरी त्यांनी पक्ष पातळीवर जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे सांगण्यात आले.या मुलाखतीच्यावेळी अनेकांनी आपणच कसे पात्र असल्याचे सांगून विजयी होण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. अनेकांनी केलेल्या कामांची माहिती असणाऱ्या फाईल सोबत आणल्या होत्या. पक्ष निरीक्षक फौजिया खान यांनी प्रत्येक उमेदवाराला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला. या मुलाखतीच्या वेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून बबलू चौधरी, भगवान शिंदे, हर्षकुमार गायकवाड, साहेबराव गायकवाड, शरद अडागळे आणि सुरेश खंडाळे, भोकरदन विधानसभा मतदारसंघातून माजी आ. चंद्रकांत दानवे, श्रीरंग जंजाळ, केशव जंजाळ, लक्ष्मण दळवी, अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक,जालना मतदरसंघातून रवींद्र तौर, नंदकिशोर जांगडे, शेख साजिया यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या.या मुलाखत समितीमध्ये निरीक्षक फौजिया खान, डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, भास्कर काळे, माजी आ. अरविंद चव्हाण, बाळासाहेब वाकुळणीकर, बळीराम कडपे, सुरेखा लहाने, अ‍ॅड. संजय काळबांडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेस