शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेअरमार्केटच्या नावाखाली लूटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:11 IST

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये चांगला मोबदला देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांना लूट

ठळक मुद्देपाच जण जेरबंद १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये चांगला मोबदला देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांना लूटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातून पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यातील पाच लाख रूपये फ्रीज करण्यात आले आहेत. तर संगणकासह इतर साहित्य असा एकूण १३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणारे शिक्षक लक्ष्मण कोंडीबा मुळे यांना शेअरमार्केटमध्ये चांगला नफा देण्याचे अमिष दाखवून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना शेअर मार्केटची माहिती देण्यात आली. विजय रावत, बिपीन रावत, आर्यन तोमर, राहुल जैन या नावाने कॉल करून प्रथम कमी रक्कमेत नफा मिळवून दिला. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२० ते ३ आॅक्टोबर २०२० या कालावधीत मुळे यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर २ लाख ३२ हजार रूपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका जालना पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक यावरून तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. संबंधित कॉल सेंटर निमुच (मध्यप्रदेश) येथील असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले. या पथकाने इंदौर, मंदसौर, निमुच या जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेत गणेशकुमार कैलासचंद्र केवट (२३), उमेश जगदीश गौर (२३ दोघे रा. कंवला, मंदसौर मध्यप्रदेश), श्रीकांत  देवकीसंजीत मिना (२२ रा.सांजलपूर मंदसौर, मध्यप्रदेश), मानसिंग रामदयाल गुजर (२३ रा. कंवला, मंदसौर मध्यप्रदेश) व हन्नी मंगल तोतला (२३ रा. बेगनपुरा जावद निमुच, मध्यप्रदेश) या पाच जणांना अटक करण्यात आली.  आरोपींनी वापरलेले दोन संगणक, हार्डडिस्क, लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर, १२ मोबाईल, १५ डेबिडकार्ड, आठ विविध बँकांचे चेकबूक, एक कार, मोबाईल क्रमांकाच्या लिस्ट, नोटबूक जप्त करण्यात आले. तसेच आरोपींच्या बँक खात्यावरील पाच लाख रूपये फ्रीज करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोनि संजय लोहकरे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, कर्मचारी तराळ, पितळे, जारवाल, राऊत, गुन्हे शाखेचे बाविस्कर यांच्या पथकाने केली.

आरोपी पोलीस कोठडीतपोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपींच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात व्यवहार दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील असंख्य नागरिकांची फसवणूक केल्याचा कायास बांधला जात आहे. कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस