लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील तीन खेळाडूंनी बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन प्राप्त केले आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.जालना जिल्हा बुद्धिबळअसोसिएशनच्या वतीने बुद्धिबळाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा भरविण्यात येतात. नुकत्याच जालन्यात राज्य पातळीवरील स्पर्धा पार पडल्या. आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन १ आॅगस्ट रोजी जागतिक बुद्धिबळ संघटनेने जाहीर केले आहे. त्यानुसार आर्यन घुगे (फिडे गुणांकन ११८९), रूतिक नेमाने (११८३) आणि ओम काकड (१०७२) प्राप्त केले आहे. या खेळाडूंना जालन्यातील ग्लोरियास अकॅडमीचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय पंच सतीश ठाकूर, कृष्णा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वीखेळाडुंचे स्वागत जालना जिल्हा बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. दयानंद भक्त, मनिष बगडिया, पन्नालाल बगडिया, कैलास लोया, शाम काबुलीवाले, रत्नाकर कुलकर्णी आदींनी स्वागत केले आहे.
जालन्याच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:03 IST