शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आठ रूपयांपासून ते शंभर रूपयांपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या हाती; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:56 IST

काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जालना ) : येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण व्हावे, म्हणून शंभर रूपयांपासून ते हजारो रूपयांपर्यंत पीक विम्याचा भरणा केला. त्यानूसार नूकसान भरपाई म्हणून बँकामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे.  परंतु काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

शेतकऱ्यांनी दिवसभर रांगेत उभे राहून पीक विम्याचा भरणा केला. भरणा केलेल्या रकमेपेक्षा किमान दोन पट रक्कम मिळणे आवश्यक असताना  ती रक्कम मिळत नसल्याने विमाधारक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. पीक विम्याच्या नावाखाली बँकांनी जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला. 

हिवराबळी येथील भाऊराव किसान लोखंडे यांनी चारशे आठ रूपयांचा विमा भरला. परंतु त्यांना फक्त आठ रूपयाचा विमा मिळाला. नळविहारा येथील भारत मोरे या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणून ६७७ रूपये भरले. त्यांच्याही खात्यात आठ रूपये जमा झाले.तसेच शरद मोरे यांनी ११८४ रूपयांचा विमा भरला त्यांच्या खात्यातर २०० रूपये जमा झाले. 

शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा आठ, दहा, शंभर, दोनशे, पाचशे रूपये  बँकेच्या खात्यात जमा होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. विमा रक्कम कमी आली, याचा शोध घेण्यासाठी शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहे. मात्र बँक अधिकारी शेतकऱ्यांना काहीच सांगत नसल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना  विमा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विमा संरक्षण रकमेचा जाफराबाद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  

बँकांना आकड्यांचा ताळमेळ लागेनाजिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांचा किती पीकविमा स्वीकारला यांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा नेमका फायदा किती होणार याची आकडेवारी कुठेच मिळत नाही. जूनच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अशा सूचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही बँकांनी रक्कम जमा केली नाही. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र