शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यानुसारच करवाढ करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:33 IST

जालना नगर पालिकेने जी नवीन वाढीव करवाढ लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चौकटीतीच राहून घ्यावा.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर यांनी घेतला करवाढीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेने जी नवीन वाढीव करवाढ लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चौकटीतीच राहून घ्यावा. नागरीकांवर अधिकचा वाढीव कर्जाचा बोजा पडू नये याची काळजी घेऊनच ही करवाढ करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.खोतकर यांच्या पुढाकाराने सोमवारी नवीन करवाढीसंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, नगर पालिकेने अवाजवी कर वाढविला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत असून अवाजवी कराची आकारणी न करता कायद्याच्या चौकटीत बसून कराची आकारणी करण्यात यावी नगर पालिकेकडून नागरिकांकडून कर आकारण्यात येतो परंतु त्यांना सेवा देताना त्या दर्जेदार स्वरूपाच्या देण्यात याव्यात पाणीपट्टीच्या स्वरूपात नागरिकांकडून कर वसूल करण्यात येतो नागरिकांना पाण्याचा सुरळीत पुरववठा करण्यात यावा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन आहेत.अशांवर कारवाई व्हावी असेही खोतकर म्हणाले. मालमत्ताचे सर्वेक्षण चुकीचे झाले असल्यास ते पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देशही राजमंत्री खोतकर यांनी यावेळी दिले.ेयावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी खांडेकर करवाढ कशी होते या बद्दल सविस्तर सांगितले. दरम्यान शिवसेनेची भूमिका मांडताना अंबेकर यांनी सांगितले की, पूर्वी ४४ हजार मालमत्ता होत्या. त्यांना चार कोटी रूपयांचा कर होता. आता त्यात दोन किंवा तीनपट वाढ झाल्यास हरकत नाही. परंतु सध्या करवाढीच्या नोटीसा या अवाजवी असल्याचे सांगून त्यावर फेरविचार करण्याची मागणी केली. दरम्यान नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी करवाढ करताना ती अचानक न करता त्यासाठी जनसुनवाणीची संधी नागरीकांना दिली असून, त्यांच्याकडून आक्षेप मागविण्यात येत आहेत. या आक्षेपांवर सुनावणी होऊनच योग्य ती करवाढ केली जाईल. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी त्यांचे मत मांडले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदArjun Khotkarअर्जुन खोतकरTaxकर