शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांच्या अनुदानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:38 IST

समग्र शिक्षा अभियानातंर्गत सन २०१९-२० च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक प्रकल्प मान्यता मंडळाच्यावतीने संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समग्र शिक्षा अभियानातंर्गत सन २०१९-२० च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक प्रकल्प मान्यता मंडळाच्यावतीने संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देण्यात आले आहे.समग्र शिक्षा अभियानातंर्गत शासकीय प्राथमिक शाळांना अनुदान देण्यात येते. यावर्षी शासनाने या अनुदानात बदल करुन शाळेच्या पंटसंख्येच्या निकषानुसार अनुदान देण्याचे ठरवले असून, ८ वीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांना हे अनुदान देण्यात येणार आहे. प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. हे अनुदान शासकीय आदिवासी विकास विभागाकडून चालणाऱ्या आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाकडून चालविलेल्या शाळा, विद्यानिकेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांसाठी आहे.शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन, सदर शाळा अनुदानाचा उपयोग करावा. संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग या शाळेतील नादुरुस्त असलेल्या लाईट, पंखे, खिडक्या, शाळेचे मैदान दुरुस्त करणे तसेच खेळाचे साहित्य दुरुस्ती, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य खरेदी, विजेचे बिल, इंटरनेट, पाण्याची सुविधा, वार्षिक देखभाल, शाळा इमारत दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती व इतर भौतिक सुविधा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी करावा, असेही पत्रात सांगण्यात आले आहे. दरम्यान, या बाबत उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.भारत सरकारच्या स्वच्छताविषयक मोहिमेच्या अनुषंगाने ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या कामी शौचालयाची स्वच्छता व शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था करणे इत्यादी बाबीसाठी या अनुदानाचा उपयोग करावा. तसेच अनुदानाचा दहा टक्के निधी हा स्वच्छेतेसाठी खर्च करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाfundsनिधी