शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

‘उज्ज्वला’च्या नावाखाली केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची वसुली केली, काँग्रेसचा आरोप

By सुनील पाटील | Updated: September 7, 2023 20:20 IST

मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे.

जळगाव : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यातील निवडणूका तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने रक्षाबंधनाची भेट म्हणून घरगुती गॅसच्या किमतीत २०० रुपयांनी कमी केल्या. मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे.

कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप व केंद्र सरकारच्या कामांचा पर्दाफाश करण्यासाठी गुरुवारी कॉग्रेस भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराध्यक्ष श्याम तायडे, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. कॉग्रेस पक्षाच्या काळात ३५० रुपये गॅस सिलिंडरचे दर होते, भाजपने ते ११०० रुपयांपर्यंत नेले. यात ८ लाख कोटी रुपये जनतेकडून वसूल केल्याचा आरोप पवार यांनी केला.

६८ टक्के लोकांचा विरोध तरी भाजप सत्तेवरलोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडणूक आले म्हणून मोदी पंतप्रधान झाले. मतांचे गणित पाहिले तर भाजपला ३२ टक्के लोकांनी मतदान केले आहे तर ६८ टक्के लोकांनी विरोध दर्शविला आहे. तरी देखील भाजपच सत्तेवर आहे. आता मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणारच नाही असा दावाही त्यांनी केला. मुंबईच इंडिया आघाडीचा धसका घेऊनच त्यांनी गॅस सिलिंडरच्या कि‌मती कमी केल्या.

कॉग्रेस सत्तेवर आल्याशिवाय चप्पल घालणार नाहीमालखेडा, ता.जामनेर येथील विकास आत्माराम राठोड या कार्यकर्त्याने देशात कॉग्रेस सत्तेवर आल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली आहे. २०१९ पासून ते अनवानी फिरत आहेत. कॉग्रेसच्या जनसंवाद यात्रेत या कार्यकर्त्याची भेट झाली. त्याला थेट पत्रकार परिषदेतच आणण्यात आले होते. ३ सप्टेबर रोजी उनपदेव, ता.चोपडा येथून सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेचा १२ सप्टेबर रोजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित सावद्यात समारोप होत आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCylinderगॅस सिलेंडरcongressकाँग्रेसBJPभाजपा