शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

१५ वर्षांपासूनची सत्ता गेली; रावसाहेब दानवेंच्या तालुक्यात भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 17:42 IST

ईटा- रामनगरमधील ग्राम पंचायतमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप बंडखोर एकत्र आले

भोकरदन : भोकरदन तालुक्यात दोन ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत  ईटा/रामनगर ही ग्रामपंचायत गावविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. तर लतीफपूर/फुलेनगर ग्रामपंचायतमध्ये  सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. 

भोकरदन तालुक्यात ईटा- रामनगर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे द्यानेश्वर पुगळे यांची 15 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकली व गावविकास आघाडीच्या ताब्यात दिली आहे.रावसाहेब दानवे यांचा तालुका आणि याच मतदार संघात मुलगा आमदार असताना झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. 

लतीफपुर/फुलेनगर ग्रामपंचायतच्या सरपंच यांचे निधन झाल्याने त्याठिकाणी सरपंच पदाची पोटनिवडणुक झाली होती.सोमवारी 6 रोजी तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणी झाली त्यात लतीफपुरच्या सरपंचपदी दिगंबर मुकींदा दाभाडे यांनी वैशाली सुरेश दाभाडे यांचा पराभव केला. दिगंबर दाभाडे यांना 534 मते पडली तर वैशाली दाभाडे यांना केवळ 89 मतावरच समाधान मानावे लागले.

तर ईटा/रामनगर ग्रामपंचायतच्या 9 सदस्य पदासाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्रस्थापिताविरुद्ध पॅनल तयार करून निवडणूक लढवत सात जागा जिकल्या.तर भाजपाच्या पॅनलला केवळ दोन जागा जिंकता आल्या. प्रयागबाई वनार्से यांना 736 मते मिळाली असून त्या सरपंचपदी निवडून आलेल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता ज्ञानेश्वर पुगळे यांना 532 मते मिळाली आहेत. तर सदस्यपदी प्रभाग क्रं 1 मधून  हरिदास जाणू वनार्से, मनोज शिवाजी वनार्से,  कोमल योगेश वनार्से, तर प्रभाग क्रं 2 मधून  नारायण रामकृष्ण वनार्से, जयश्री स्वप्नील पुगळे, मीरा बाळकृष्ण वनार्से, तर प्रभाग क्रं 3 मधून सुनील गणेश वनार्से, सविता कृष्णा कांबळे, मनीषा किशोर वनार्से हे नऊ सदस्य विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.  यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ई. गायकवाड, आर. आर. पडोळ, तर सहाय्यक म्हणून के. जी. पडोळ, के. एस. गिरणारे यांनी काम पाहिले. तसेच एस. पी. कदम, आर. डी. देशपांडे, एस. एस. तायडे, गणेश सपकाळ, आर. एन. सानप आदींनी मतमोजणी कामात परिश्रम घेतले.

टॅग्स :JalanaजालनाBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवेgram panchayatग्राम पंचायत