हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे मोठे सहकार्य लाभले.
चौकट
पतंजली योग समिती सदस्यांचा उत्साह
पतंजली योग समितीच्या वतीनेदेखील रविवारी सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. येथील रेल्वेस्थानक परिसरातील कृष्णवाटिका गृह संकुलात हे शिबिर पार पडले. याचा शुभारंभ बांधकाम व्यावसायिक रितेश मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, अंबडचे मुख्याधिकारी विक्रम मांडूरके, डॉ. संतोष जायभाये, डॉ. संतोष राऊत, संयोजक पतंजली योग समितीचे योग शिक्षक माउली हरबक, वास्तुविशारद रवि हरबक, श्रीपत खरात, राम खारवणे, विनाेद देशमुख, परमेश्वर मोरे, मुकुंद जहागीरदार, सोपान लोाखंडे, सुनील सोनी आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात मीरा लोखंडे, संगीता कदम, सुचिता देशमुख या तीन महिलांनीदेखील रक्तदान करून महिलाही कुठेच मागे नाहीत हा संदेश दिला.