शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 19:45 IST

आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

- अशोक डोरलेअंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागील सात दिवसांपासून सुरू आहे. शासनाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतायत याचा अभिमान वाटतो. परंतु, आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील सात दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. लाठीचार्ज, गोळीबार प्रकरणानंतर या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांच्या भावना 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनोज जरंगे यांच्या घरी आजोबा रावसाहेब जरांगे, आजी पर्वती जरंगे, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज, मुली वैष्णवी, प्रणाली, पल्लवी हे होते. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मनोज जरांगे व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलांचे शिक्षण सुरू असून, शिवराज जालन्याला अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वैष्णवी बारावीला असून ती नीट परीक्षेची तयारी करते. प्रणाली नववीला असून, पल्लवी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे हे कुटुंब साक्षीदार नव्हे त्यांना वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांनी पाठींबा दिला. परंतु, यावेळचे आरक्षण अधिकच चर्चेत आले आहे. लाठीहल्ला, गोळीबार, दाखल होणारे गुन्हे यामुळे कुटुंबियांची चिंता वाढत आहे. शिवाय मनोज जरांगे यांच्या लढ्याचा अभिमान आहे. परंतु, त्यांची खालावणारी प्रकृती कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे शासनाने आरक्षणाचा प्रश्न सकारात्मक दृष्टीने मार्गी लावावा, अशी मागणीही हे कुटुंबिय करीत आहेत.

खूप अभिमान वाटतोगावाकडच्या दोन एकर शेतीतून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. याचा मला अभिमान आहे. बेमुदत उपोषण काळात त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे चिंता वाटत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. याचा मराठा समाजातील गरिब कुटुंबातील मुलांना लाभ होईल.- सुमित्रा जरांगे, पत्नीकोट

वडील भावनिक होतील, म्हणून जात नाहीमाझे वडिल आरक्षणाची लढाई लढत आहेत. अंतरवाली सराटी येथे आंदोलनात जावून त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. परंतु, वडील भावनिक होतील म्हणून जाता येत नाही. त्यांच्या आरोग्याची खूप काळजी वाटते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले तर गरजू कुटुंबातील मुलांना त्याचा लाभ होईल. शासनाने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.- शिवराज जरांगे, मुलगा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाFarmerशेतकरी